राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:18 AM2018-12-29T05:18:49+5:302018-12-29T05:19:13+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पक्षाचा १३४ वा स्थापना दिन येथील अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात शुक्रवारी केक कापून साजरा केला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

 Rahul Gandhi, Manmohan Singh celebrates Congress' day | राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा

राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा

Next

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पक्षाचा १३४ वा स्थापना दिन येथील अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात शुक्रवारी केक कापून साजरा केला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
त्याआधी स्वातंत्र्य आंदोलन व त्यानंतरच्या कालावधीतील दिग्गज काँग्रेस नेत्यांना आदरांजली अर्पण केली. स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा आदी उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष वाढविण्याकरिता व टिकून राहाण्यासाठी १३४ वर्षांत असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्या सर्वांना सलाम. काँग्रेस पक्षाने केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अहिंसा तत्त्वज्ञानावर काँग्रेस पक्षाचा गाढा विश्वास आहे. हा मार्ग आम्ही कधीही सोडणार नाही, असे न्याय, समानता, एकता, स्वातंत्र्य या मूल्यांची जपणूक करण्याचे, तसेच सर्वांशी संवाद साधण्याचे आमचे धोरण आहे. या मूल्यांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव दक्ष राहू.

ह्यूम यांनी केली काँग्रेसची स्थापना
काँग्रेसची स्थापना १८८५ साली ब्रिटिश सनदी अधिकारी अ‍ॅलन आॅक्टव्हियन ह्यूम याने केली. ह्यूम हे पक्षीशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांना भारतीय पक्षीशास्त्राचे जनक असेही म्हटले जाते.

Web Title:  Rahul Gandhi, Manmohan Singh celebrates Congress' day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.