देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट; भाजपने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:50 AM2024-09-12T08:50:09+5:302024-09-12T08:50:40+5:30

देशासाठी हालचाली धोकादायक असल्याचा दावा

Rahul Gandhi met those who took anti-national stance; BJP made the allegation | देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट; भाजपने केला आरोप

देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट; भाजपने केला आरोप

नवी दिल्ली - भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधी इल्हान उमर व अन्य लोकांच्या भेटीगाठी घेतल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बुधवारी भाजपने सडकून टीका केली. राहुल गांधी परदेशात करत असलेल्या हालचाली धोकादायक आहेत, असेही या पक्षाने म्हटले आहे. 

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, राहुल गांधी धोकादायक गोष्टींमध्ये गुंतले आहेत. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने विदेशात भेट घेण्याचा भारताच्या इतिहासातील हा बहुधा पहिलाच प्रसंग असेल. काश्मीरबाबत पाकला पाठिंबा देणाऱ्या व भारताच्या विरोधाची कायम भूमिका घेणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी इल्हान उमर यांनी याआधी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. त्या दौऱ्याचा खर्च पाकिस्तानने केल्याचेही उघड झाले होते. 

आरक्षणविरोधी चेहरा उघड झाला : शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा उघड झाला आहे. देशविरोधी वक्तव्ये करण्याची त्यांना व काँग्रेसला सवय जडली आहे. भारतामध्ये न्याय्य परिस्थिती निर्माण झाल्यावर आम्ही आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करू, असे राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटले होते. शाह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने घेतलेल्या देश आरक्षणविरोधी भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा दिला. राहुल गांधी विदेश दौऱ्यात निराधार गोष्टी सांगून भारताची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. 

विदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग राहुल गांधी करतात. आता त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

काँग्रेसचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. एका बाजूला खोटे कथानक तयार करायचे व दुसरीकडे आरक्षण संपविण्याची गोष्ट करायची हे अतिशय चुकीचे आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजप आणि शिंदेसेना त्यांच्या सवयीप्रमाणे खोटा प्रचार करीत आहे.
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Web Title: Rahul Gandhi met those who took anti-national stance; BJP made the allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.