दरवर्षी 1 कोटींची कमाई, हातात 55 हजार रोख अन्..; जाणून घ्या राहुल गांधींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:10 PM2024-04-03T22:10:21+5:302024-04-03T22:10:48+5:30
राहुल गांधींनी बुधवारी वायनाड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती समोर आली आहे.
Rahul Gandhi Net Worth:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून राहुल गांधी यांची संपत्तीची माहिती समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी दरवर्षी 1 कोटींहून अधिकची कमाई करतात. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे वार्षिक उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते, तर 21-22 मध्ये 1,31,04,970 कोटी रुपये होते. सध्या राहुल यांच्याकडे 55,000 रुपये रोख आहेत.
4 कोटींहून अधिक किमतीचे शेअर्स
राहुल यांच्या बँक खात्यात 26,25,157 रुपये जमा आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे केवळ 55 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे यंग इंडियनचे 1900 शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 100 रुपये प्रति शेअर आहे. याशिवाय त्यांच्याकडे 4,33,60,519 रुपयांचे इतर कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांनी म्युच्युअल फंडात 3,81,33,572 रुपये आणि गोल्ड बाँडमध्ये 15,21,740 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबतच पोस्ट ऑफिस आणि विमा पॉलिसींमध्ये 61,52,426 रुपये गुंतवले आहेत. राहुल यांची एकूण जंगम मालमत्ता 9,24,59,264 रुपयांची आहे.
11 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता
राहुल गांधी यांच्याकडे 11,15,02,598 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्यावर 49,79,184 रुपयांचे कर्जही आहे. यासोबतच त्यांच्या नावावर दिल्लीतील मेहरौली येथे दोन शेतजमिनी आहेत. ही जमीन त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 2,10,13,598 रुपये आहे. राहुल यांच्याकडे स्वतःचे घर नाही, पण गुरुग्राममध्ये 9 कोटी रुपयांच्या दोन व्यावसायिक इमारती आहेत