मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 04:45 PM2018-11-15T16:45:04+5:302018-11-15T16:48:53+5:30
राहुल गांधी सध्या शिकत आहेत. त्यांना मी नेता मानत नाही, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी सध्या शिकत आहेत. त्यांना मी नेता मानत नाही, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले.
एएनआयच्या माहितीनुसार, मी राहुल गांधींना नेता मानत नाही. अद्याप त्यांना कोणतेही पद मिळाले नाही. जेव्हा पद मिळेल तेव्हा समजेल. सध्या ते शिकत आहेत. ज्यावेळी त्यांना देशातील जनता स्वीकारेल. तेव्हा ते नेता बनतील, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले आहे.
#WATCH: Former Union Law Minister Hansraj Bhardwaj says, "I don't consider Rahul Gandhi a leader yet. He'll understand when he gets a post. Congress fails because it indulges in politics of religion. Rahul Gandhi is learning. He will become a leader when public accepts him" pic.twitter.com/efiXSV6Eov
— ANI (@ANI) November 15, 2018
याचबरोबर, इंदिरा गांधी किंवा जवाहरलाल नेहरु यांनी कधीच धर्माचे राजकारण केले नाही. मात्र, राहुल गांधी मंदिरांमध्ये जात आहेत. त्यामुळे धर्माचे राजकारण होत असून यामुळे काँग्रेसला अपयश येत असल्याचेही हंसराज भारद्वाज यांनी म्हटले आहे.