"राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा", काँग्रेस नेत्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:12 PM2020-08-09T16:12:09+5:302020-08-09T16:13:02+5:30
काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान अध्यक्ष निवडीवरून काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षाला सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान अध्यक्ष निवडीवरून काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षाला सल्ला दिला आहे. "राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा" असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांना पक्षाचं अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची निवड करायला हवी असं म्हटलं आहे. तसेच काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांना काँग्रेस अध्यक्ष निवडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं आहे. अध्यक्ष निवडीवर निर्णय घेऊन नवीन अध्यक्ष निवडला जावा. ही अनिश्चितता राहायला नको. यामुळे नुकसान होऊ शकतं असं सिंघवी यांनी म्हटलं आहे.
"सध्या आमची परिस्थिती वाईट आहे. गांधी कुटुंबाच्या बलिदान, काम यामुळेच सर्वांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी असं वाटतं आणि हे साहजिक आहे. यात चुकीचं काहीच नाही. पण त्यांना अध्यक्षपदावर यायचं नसेल तर यावर लोकशाही पद्धतीने तोडगा काढायला हवा" असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"देशात वाढत असलेली असत्याची घाण करायची आहे साफ", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/WIuou6nhaZ#RahulGandhi#Narendermodi
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2020
भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कागदपत्र हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या आहेत असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोक्सी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा देखील समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे" अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
गाडी चालवताना हेल्मेट वापरणं सक्तीचं नाही?, काय आहे हे नेमकं प्रकरण; पोलीस म्हणतात...https://t.co/H1Az1DmMCh#helmet#bike
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2020
CoronaVirus News : पापड खाऊन व्हायरसचा सामना करा असा सल्ला देणाऱ्या मंत्र्यांनाच कोरोनाची लागणhttps://t.co/3AgMIjcfXp#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2020
महत्त्वाच्या बातम्या
माणुसकीला काळीमा! नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं, रडण्याचा आला आवाज अन्...
बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा
घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन
CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा
"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"
Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू