'इथे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे अंबानींच्या लग्नात फोटोसेशन सुरू आहे'- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 02:26 PM2024-03-03T14:26:42+5:302024-03-03T14:27:20+5:30
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न गुजरातच्या जामनगरमध्ये होत आहे. यावरुन राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Rahul Gandhi News:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या मध्य प्रदेशात पोहोचली आहे. यावेळी राहुल यांनी अनंत अंबानी यांच्या लग्नावरुन सरकारवर जोरदार घणाघात केला. 'अंबानींच्या घरात लग्न आहे, तिथे लोक सेल्फी काढत आहेत आणि तुम्ही इथे उपाशी मरत आहात,' अशी टीका राहुल यांनी केली.
ग्वाल्हेरमध्ये लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'राहुल गांधी काय बोलत आहेत, ते कुठे दाखवणार? सध्या टीव्हीवर फक्त अंबानींच्या मुलाचे लग्न दाखवले जात आहे. लग्न मोठ्या थाटामाटात सुरू आहे, जगभरातून लोक येत आहेत, सेल्फी काढत आहेत आणि तुम्ही लोक इथे उपाशी मरत आहात,' असंही राहुल यावेळी म्हणाले.
#WATCH | Gwalior, Madhya Pradesh: During the Bharat Jodo Nyay Yatra, Congress MP Rahul Gandhi says, "Today, there is maximum unemployment in the country in the last 40 years. India has double the unemployment as compared to Pakistan. We have more unemployed youth than Bangladesh… pic.twitter.com/friZnVtHA0
— ANI (@ANI) March 3, 2024
बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी
राहुल गांधी पुढे म्हणतात, 'भारत जोडो यात्रेनंतर आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली. या प्रवासात आम्ही 'न्याय' हा शब्द जोडला, कारण देशात पसरत असलेल्या द्वेषाचे कारण 'अन्याय' आहे. सध्या देशातील बेरोजगारी 40 वर्षांतील सर्वात जास्त आहे. भारतात पाकिस्तान, बांग्लादेश आणि भुटानपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीच्या माध्यमातून छोटे उद्योग उद्ध्वस्त केले. '
जात जनगणनेवर प्रतिक्रिया...
यावेळी राहुल यांनी पुन्हा एकदा जात जनगणनेच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. 'देशात सुमारे 50% ओबीसी, 15% दलित आणि 8% आदिवासी लोक आहेत. देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात ओबीसी, दलित आणि आदिवासी वर्गातील एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार देशातील 73% लोक मोठ्या रुग्णालये आणि खाजगी शाळांच्या व्यवस्थापनात दिसत नाहीत, परंतु मनरेगा आणि कंत्राटी कामगारांच्या यादीत दिसतील. पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या, त्यामुळे या 73% लोकांचा सहभाग असायचा, आता सर्व काही खाजगी केले जात आहे', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.