Rahul Gandhi On PM: '20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 04:43 PM2023-04-02T16:43:57+5:302023-04-02T16:44:47+5:30
Rahul Gandhi Slams PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पीएम मोदींना प्रश्न विचारले आहेत.
Rahul Gandhi Slams PM Modi Over Adani :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यानंतर आता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. रविवारी (2 एप्रिल) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये कोणाचे? असा सवाल केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून 59 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी हा प्रश्न विचारला आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “पंतप्रधान जी, प्रश्न विचारुन खूप दिवस झाले. तुम्ही अजून उत्तर दिले नाही, त्यामुळे आज परत विचारतोय. ₹20,000 कोटी कोणाचे आहेत? LIC, SBI, EPFO मध्ये जमा असलेले लोकांचे पैसे अदानीला का दिले जात आहेत?''
राहुल गांधींचा फेसबुक व्हिडिओ:-
अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक
अदानी मुद्द्यावरुन केंद्र सरकारविरोधात राहुल गांधी सातत्याने आक्रमक होत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत सरकारला घेरले. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मागणीमुळे संसदेत सतत गोंधळाचे वातावरण आहे.
काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल
अदानी प्रकरणावर राहुल गांधी सरकारला प्रश्न विचारत असल्यामुळे भाजपने त्यांचे सदस्यत्व काढले, असा आरोप काँग्रेस करत आहे. 25 मार्च रोजीही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा एक व्हिडिओ शेअर करताना केंद्रावर निशाणा साधला होता. मी सत्य बोलतो, देशाच्या हितासाठी बोलतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी सत्याच्या मार्गावर चालेन, असे ट्विट त्यांनी केले होते.