Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 08:43 PM2023-01-09T20:43:29+5:302023-01-09T20:44:22+5:30

Bharat Jodo Yatra : "आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत, कारण..."

Rahul Gandhi on RSS congress mp rahul gandhi says rss people are kauravas of 21st century | Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

Next

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर म्हणजेच आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींनी हरियाणातील कुरुक्षेत्रातून आरएसएसचे लोक म्हणजे, 21व्या शतकातील कौरव असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, "21 व्या शतकातील कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि शाखा चालवतात. त्यांच्यामागे देशातील 2-3 श्रीमंत लोक उभे आहेत."

राहुल गांधी म्हणाले, 'आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत. कारण भगवान शिव हे तपस्वी होते आणि हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. या लोकांनी जय सिया राममधून माता सीतेलाच बाजूला केले. हे लोक भारतीय संस्कृतीविरोधात काम करत आहेत.' एवढेच नाही, तर पांडवांनी कधीही कुणाचे वाईट केले नव्हते. आमच्या भारत जोडो यात्रेत कुणाला धर्म विचारला गेला नाही, असेही राहुल यावेळी म्हणाले.

RSS वर हल्लाबोल -
राहुल गांधी यांची भारत जेडो यात्रा सध्या कुरुक्षेत्रात आहे. ते रविवारी म्हणाले होते, "भारत जोडो यात्रा ही बेरोजगारी आणि महागाईबरोबरच समाजात द्वेष आणि भीती पसरवण्याच्या विरोधात आहे. राहुल गांधी म्हणाले, आम्ही हिच्याकडे एक तपस्या म्हणून पाहत आहोत. काँग्रेसचा 'तपस्ये'वर विश्वास आहे तर भाजप पूजेची संघटना आहे. भाजप आणि आरएसएस 'तपस्ये'चा आदर करत नाहीत. तर जे त्यांची पूजा करतात त्यांचाच सन्मान व्हावा अशी त्यांची इच्छा असते, असेही राहुल म्हणाले होते."

 

Web Title: Rahul Gandhi on RSS congress mp rahul gandhi says rss people are kauravas of 21st century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.