लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांमध्ये राहुल गांधींचा समावेश

By मोरेश्वर येरम | Published: December 23, 2020 02:40 PM2020-12-23T14:40:49+5:302020-12-23T15:26:57+5:30

१ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती.

rahul Gandhi is one of the top 10 MPs who helped in the lockdown | लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांमध्ये राहुल गांधींचा समावेश

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांमध्ये राहुल गांधींचा समावेश

Next
ठळक मुद्दे'टॉप-१०' खासदारांमध्ये शिवसेनेच्याही खासदाराने पटकावला मानलॉकडाउनमध्ये जनतेला सर्वाधिक मदत केलेले खासदार कोण?महाराष्ट्रातील दोन खासदारांचा टॉप-१० मध्ये समावेश

नवी दिल्ली
राजधानी दिल्ली स्थित सिटीझन एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म GovernEye या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतात लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक मदत केलेल्या खासदारांमध्ये उज्जैनचे भाजपचे खासदार अनिल फिरोजिया, वायएसआरसीपी पक्षाचे आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथील खासदार अडाला प्रभाकर रेड्डी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. 

१ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती. या सर्वेक्षणासाठी मिळालेल्या अर्जांच्या आधारावर ही अंतिम २५ नाव निश्चित करण्यात आली होती. यातून प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्रायातून सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. 

टॉप-१० यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. नागपुरचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या दोन खासदारांनी राज्यात लॉकडाऊन काळात सर्वाधिक मदत केल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

'टॉप १०' खासदारांची यादी पुढीलप्रमाणे:
अनिल फिरोजिया (भाजप), अडाला प्रभाकर रेड्डी (वायएसआरसीपी), राहुल गांधी (काँग्रेस), महुआ मोइत्रा (टीएमसी), एल.एस.तेजस्वी सूर्या (भाजप), हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना), सुखबीर सिंग बाद (एसएडी), शंकर लालवानी (भाजप), डॉ. टी. सुमाती थमीझाची थांगापांडियन (डीएमके) आणि नितीन गडकरी (भाजप)

एकूण ५१२ लोकसभा खासदारांसाठी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ३३,८२,५६० लोकांचे वैध अभिप्रायांची पडताळणी यावेळी करण्यात आल्याचं GovernEye संस्थेने सांगितलं. 
 

Web Title: rahul Gandhi is one of the top 10 MPs who helped in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.