कधी पीएम मोदींना मिठी तर सिंधियांना मारला डोळा; आता फ्लाइंग KISS मुळे राहुल गांधी चर्चेत…

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:06 PM2023-08-09T18:06:23+5:302023-08-09T18:07:48+5:30

Parliament Mansoon Session: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केला आहे.

Rahul Gandhi, Parliament Monsoon Session: hugged to PM Narendra Modi now flying kiss in lok sabha | कधी पीएम मोदींना मिठी तर सिंधियांना मारला डोळा; आता फ्लाइंग KISS मुळे राहुल गांधी चर्चेत…

कधी पीएम मोदींना मिठी तर सिंधियांना मारला डोळा; आता फ्लाइंग KISS मुळे राहुल गांधी चर्चेत…

googlenewsNext

Parliament Mansoon Session: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यात विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर चर्चेदरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या एका कथित कृतीची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर 'फ्लाइंग किस' (Flying Kiss) केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या या कृतीविरोधात महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. 

एनडीएच्या (NDA) अनेक महिला खासदारांनी दावा केलाय की, राहुल गांधी भाषण संपवून सभागृहाबाहेर जात असताना महिला खासदारांच्या दिशेने फ्लाइंग किस केले. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी लोकसभेत विचित्र किंवा अनोखी कृती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या अधिवेशनात राहुल गांधी आपल्या सहकारी खासदाराला डोळा मारुन आणि पंतप्रधान मोदींना मिठी मारुन चर्चेत आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभागृहात मिठी मारली
2018 मध्येही विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावातील चर्चेदरम्यान राहुल गांधी भाषण करत होते. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, माझ्या बोलण्यात सत्य आहे, म्हणूनच पीएम मोदी माझ्याशी नजर मिळवायला घाबरत आहेत. मी भाजप आणि आरएसएसचा आभारी आहे, ज्यांनी मला काँग्रेसचा खरा अर्थ समजून सांगितला आणि शिवभक्त बनवले. यानंतर ते आपल्या आसनावरुन उठले आणि पीएम मोदींकडे (Narendra Modi) जाऊन त्यांना मिठी मारली. 

ज्योतिरादित्य सिंधियांना डोळा मारला
त्याचदरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, भाजपवाले मला शिव्या देऊ शकतात, पण मला राग येत नाही. मी काँग्रेस आहे आणि याच भावनेने देशाला बनवले आहे. याच भावनेला तुमच्यातून काढेल आणि तुम्हालाही काँग्रेसमध्ये आणले. यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली आणि आपल्या आसनावर येऊन बसले. यावेळी त्यांनी बाजुला बसलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना डोळा मारला. तेव्हा सिंधिया काँग्रेसमध्ये होते. त्यांची ही कृती खूप व्हायरल झाली होती.

फ्लाइंग किसने राहुल पुन्हा चर्चेत 
आता परत एकदा विरोधकांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर तीन दिवस चर्चा होणार आहे. चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी भाषण करत होते. भाषण संपवून ते सभागृहाबाहेर जाताना त्यांनी महिला खासदारांना फ्लाइंग किस केल्याचा आरोप आहे. याविरोधात एनडीएकील महिला खासदारांनी सभापतींकडे या कृतीविरोधात तक्रार केली आहे. यावर अद्याप राहुल गांधींकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Rahul Gandhi, Parliament Monsoon Session: hugged to PM Narendra Modi now flying kiss in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.