'बालकबुद्धी, त्यांनी आधी बोलण्याची ट्यूशन घ्यावी', केंद्रीय मंत्र्यांची राहुल गांधींवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:52 PM2024-07-29T19:52:13+5:302024-07-29T19:53:56+5:30
Dharmendra Pradhan: 'आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली.'
Dharmendra Pradhan on Rahul Gandhi :काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी (29 जुलै) लोकसभेत केलेल्या भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आयोजित हलवा समारंभाचे पोस्टर दाखवले. आता यावरुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी ने आज लोकसभा में बजट पर चर्चा का समय का इस्तेमाल फिर अपनी नकारात्मक राजनीति के लिए किया है। कांग्रेस पार्टी द्वारा इरादतन रूप से बार-बार सदन की गरिमा को गिराने का काम किया गया है। नेता प्रतिपक्ष होने के नाते पहले श्री राहुल गांधी जी को सदन की मर्यादा…
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 29, 2024
'राहुल गांधींनी ट्यूशन घ्यावी'
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना सभागृहाच्या मर्यादेत राहून कसे बोलावे, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यांनी सभागृहाचे नियम नीट समजून घ्यावेत आणि त्यानुसार वागावे. सभागृह हे राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असते, स्वतःच्या राजकारणासाठी संसदेच्या प्रतिष्ठेची खिल्ली उडवणे निषेधार्ह आहे. निवडणूक रॅलीत भाषण करणे आणि संसदेत भाषण करणे, यात फरक आहे. आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
'बालबुद्धी असण्याचा हा तोटा आहे'
ते पुढे म्हणाले की, 'विरोधक नेहमीच संविधान दाखवतात, पण सुरुवातीपासूनच ते संविधानाचा अपमान करत आले आहेत. मूळात हेच लोक सर्वात मोठे संविधानविरोधी आहेत. देशातील दलित, गरीब, शेतकरी, विद्यार्थी, खेळाडू आणि मध्यमवर्गीयांबद्दल काँग्रेसचे काय विचार आहेत, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने देशाला घराणेशाही, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि कुशासनाच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवले, ज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये देशाला मुक्त केले. 'बालबुद्धी' असण्याचा हा तोटा आहे. आधी गोष्टी वाचत नाहीत, वाचल्या तरी समजायला अडचण येते,' अशी बोचरी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केली.