२०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणार असेल, भाजप सत्तेतून बाहेर जाणार; राहुल गांधींचा अमेरिकेतून मोठा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:21 PM2023-06-02T13:21:35+5:302023-06-02T13:22:55+5:30

राहुल गांधी दोन दिवसापासून अमेरिका दौऱ्यावर आहेत.

rahul gandhi prediction bjp out of power in 2024 election result will surprise | २०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणार असेल, भाजप सत्तेतून बाहेर जाणार; राहुल गांधींचा अमेरिकेतून मोठा अंदाज

२०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणार असेल, भाजप सत्तेतून बाहेर जाणार; राहुल गांधींचा अमेरिकेतून मोठा अंदाज

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या दोन दिवसापासून अमेरिका दौऱ्यावर आहेत, त्यांनी अमेरिकेतून भाजपवर निशाणा साधला आहे. काल राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरुन मोठं विधान केलं. राहुल गांधी म्हणाले, २०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणारा असेल. भाजप सत्तेतून जाणार असल्याच मोठं विधान गांधी यांनी केलं. 

राहुल गांधी म्हणाले, विरोधक एकजूट आहेत आणि आम्ही पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर काढू. वॉशिंग्टन येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. 'माझा विश्वास आहे की काँग्रेस पुढच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. मला वाटते की ही निवडणूक लोकांना आश्चर्यचकित करेल. तुम्ही गणित करा. एकजूट विरोधक भाजपचा पराभव करतील. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम वर्ष उरले असून त्याआधी राहुल गांधींचे हे भाकीत महत्त्वाचे आहे.

काँग्रेसचे माजी खासदार म्हणाले, 'विरोधक चांगलेच एकवटले आहेत. आम्ही सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. मला वाटते की ऐक्याबद्दल एक चांगली गोष्ट चालू आहे. हे थोडे क्लिष्ट देखील आहे कारण अनेक ठिकाणी आपली स्पर्धा विरोधी पक्षांशी आहे, ज्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निवडणुकीत कुठेतरी पाठिंबा घ्यावा लागतो आणि कुठेतरी द्यावा लागतो. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी पाहायला मिळेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करणअयात आले आहे. लोकसभेचे सदस्यत्व गमावल्याने मला फायदा होईल, असे राहुल गांधी म्हणाले. 'यामुळे मला स्वतःला बदलण्यास मदत होईल. मला वाटते त्यांनी एक भेट दिली आहे. त्यांना माहित नाही, पण त्यांनी तेच केले. भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांना जम्मू-काश्मीरला जाण्यापासूनही रोखले. 

'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा

'मला मरणाची भीती वाटत नाही, प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे. हे मी माझ्या आजी आणि वडिलांकडून शिकलो. तुम्ही मागे हटू शकत नाही कारण कोणीतरी तुम्हाला हवे आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी १० दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Web Title: rahul gandhi prediction bjp out of power in 2024 election result will surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.