काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधींच्या प्रश्नानं उडाली भंबेरी; इथं कोण-कोण पितं?, उत्तर आलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 09:37 AM2021-10-27T09:37:53+5:302021-10-27T09:39:11+5:30

आताच्या परिस्थितीनुसार सदस्यता नियमांमध्ये बदल करणं गरजेचे आहे. परंतु ते तातडीने बदलू शकत नाहीत.

Rahul Gandhi question in the Congress meeting asked Who Drinks Here, Party leaders was shocked ; Who drinks here ?, the answer came ... | काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधींच्या प्रश्नानं उडाली भंबेरी; इथं कोण-कोण पितं?, उत्तर आलं...

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधींच्या प्रश्नानं उडाली भंबेरी; इथं कोण-कोण पितं?, उत्तर आलं...

Next
ठळक मुद्देपक्षाच्या सदस्यत्वासाठी १० नियमांचा समावेश आहे. त्यात दारु आणि ड्रग्ज सेवन न करण्याचा उल्लेख आहे.दारु न पिणे हा नियम महात्मा गांधी यांच्या काळापासून सुरु आहेबैठकीत राहुल गांधी यांनी इथं कोण पितं? या प्रश्नावर उपस्थित सदस्यांमध्ये कुजबूज सुरु झाली

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांनी सर्व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीचं आयोजन केले होते. या बैठकीत पुन्हा एकदा दारु आणि खादी याचा मुद्दा चर्चेत आला. २००७ मध्ये या मुद्द्यावरुन प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मंगळवारी हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. काँग्रेसकडून सध्या सदस्यता अभियानाला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी राहुल गांधींच्या एका प्रश्नानं सगळ्यांची भंबेरी उडाली.

काँग्रेसच्या(Congress) सदस्यता अभियानाच्या नियमात दारुचं सेवन करू नये असं सांगण्यात आले आहे. या बैठकीवेळी हा मुद्दा बराच चर्चेत आला. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, बैठकीत राहुल गांधी यांनी इथं कोण पितं? या प्रश्नावर उपस्थित सदस्यांमध्ये कुजबूज सुरु झाली. तेव्हा नवज्योत सिंग सिद्धूकडे अनेकांनी पाहिलं. त्यावर नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, आमच्या राज्यात बहुतांश लोकं पितात. परंतु सिद्धू यांनी कुठल्याही नावाचा उल्लेख केला नाही. दारुपासून लांब राहणे आणि खादी घालणे हा काँग्रेसचा जुना नियम आहे.

आताच्या परिस्थितीनुसार सदस्यता नियमांमध्ये बदल करणं गरजेचे आहे. परंतु ते तातडीने बदलू शकत नाहीत. पक्षातील नियमांमध्ये केवळ कार्यकारणी कमिटीच बदल करू शकते. त्यात दारु न पिणे हा नियम महात्मा गांधी यांच्या काळापासून सुरु आहे. राहुल गांधी यांनी २०१७ च्या काँग्रेस कार्यकारणी कमिटीत या नियमाच्या वास्तविक आणि व्यवहारिकतेवर प्रश्न उभे केले होते. १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्यता अभियान सुरु होत आहे. या अर्जात या नियमाचा उल्लेख आहे.

पक्षाच्या सदस्यत्वासाठी १० नियमांचा समावेश आहे. त्यात दारु आणि ड्रग्ज सेवन न करण्याचा उल्लेख आहे. त्याचसोबत नवीन सदस्यांना सार्वजनिक ठिकाणी पक्षाच्या धोरणांवर टीका करण्यावर बंदी आहे. पक्षाचं सदस्य बनण्यासाठी काँग्रेसकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत. तसेच याच्या माहितीसाठी प्रशिक्षणही दिलं जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

काँग्रेसच्या महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांना सल्ला देत अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीत सांगितले की, देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस रोज विधानं करतं परंतु स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहचत नाही. धोरणात्मक बाबींवर राज्यातील नेत्यांमध्ये मतभेद आणि एकजुट नसल्याचं दिसून येते. आपल्याला भाजपा-आरएसएससारख्या द्वेषपूर्ण विचारधारेशी मुकाबला करायचा आहे. त्यांनी दिलेली खोटी आश्वासनं उघड करायची आहेत असं सोनिया गांधींनी म्हटलं.  

Web Title: Rahul Gandhi question in the Congress meeting asked Who Drinks Here, Party leaders was shocked ; Who drinks here ?, the answer came ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.