राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:38 PM2020-07-07T12:38:59+5:302020-07-07T13:15:11+5:30
चीनने गलवान खोऱ्या आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि चिनी पक्षाशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या चर्चेबाबत राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले आहेत.
नवी दिल्ली: लडाखमध्ये दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव निवळला आहे. चिनी सैन्य गलवानमधून 2 किलोमीटर मागे गेलं आहे. चीन सरकारकडूनदेखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील अनेक पोस्टवरून चिनी सैन्यानं माघार घेतली असून भारतीय जवान परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव कमी करण्यात सरकारला यश आल्याचं चित्र आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. मात्र यावरून आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
चीनने गलवान खोऱ्या आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि चिनी पक्षाशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या चर्चेबाबत राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच अजित डोवाल आणि चिनी स्टेट काऊंसिलर वांग यी यांच्या चर्चेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून जारी केलेले निवेदन शेअर करत तीन प्रश्न विचारले आहेत.
National interest is paramount. GOI's duty is to protect it.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 7, 2020
Then,
1. Why has Status Quo Ante not been insisted on?
2. Why is China allowed to justify the murder of 20 unarmed jawans in our territory?
3. Why is there no mention of the territorial sovereignty of Galwan valley? pic.twitter.com/tlxhl6IG5B
"राष्ट्रहीत हे सर्वोच्च आहे. त्याचे रक्षण करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. मग असं असताना...
1. जैसे थे स्थितीबाबत दबाव का टाकण्यात आला नाही?
2. चीन आमच्या भूभागात 20 निशस्त्र जवानाच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे?
3. गलवान खोऱ्यातील आमच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाचा उल्लेख का केला गेला नाही?"
असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलhttps://t.co/uX981WFEPH#coronavirus#CoronaUpdatesInIndia#RahulGandhi#Congress#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2020
कोरोना व्हायरसवरून राहुल गांधी यांनी सोमवारी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असं म्हटलं होतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदींना टोला लगावला. "हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी शिकवल्या जातील" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता
कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग
India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या