अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:31 AM2024-09-21T07:31:59+5:302024-09-21T07:33:00+5:30

बेरोजगारीला कंटाळून त्याने अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी (डंकी मार्गाने) केली होती. आता तो भारतात परतू शकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे आश्वासन राहुल यांनी शुक्रवारी पूर्ण केले.

Rahul Gandhi reached the house of the young man he met in America early in the morning Tired of unemployment in India, the young man infiltrated America | अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी

अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी

आदेश रावल

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी (दि. २०) सकाळी अचानक करनाल जिल्ह्यातील गोगडीपूर गावात पोहोचले. तेथे त्यांनी एका कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना तेथे त्यांची अमित नामक युवकाशी भेट झाली होती. बेरोजगारीला कंटाळून त्याने अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी (डंकी मार्गाने) केली होती. आता तो भारतात परतू शकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे आश्वासन राहुल यांनी शुक्रवारी पूर्ण केले.

अमितने अमेरिकेत आश्रय मागितल्यानंतर तो मिळाला. पण, आता त्याला भारतात परतायचे तर नियमानुसार तसे करता येत नाही. 

हा प्रश्न संसदेत उपस्थित करणार

राहुल यांनी अमेरिकेत त्याची भेट झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना हरयाणात भेटायला जाईन, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राहुल शुक्रवारी पहाटेच ५ वाजता अमितच्या कुटुंबीयांच्या घरी पोहोचले.

मध्यंतरीच्या काळात राहुल यांनी अनेक युवकांची भेट घेतली होती, जे बेरोजगारीला कंटाळून गैरमार्गाने अमेरिकेत पोहोचले आणि आता ते तेथेच अडकले. आपण हा प्रश्न संसदेत उपस्थित करूत ज्यामुळे केंद्र सरकार नक्कीच यातून मार्ग काढू शकेल, असे आश्वासन राहुल यांनी अमितच्या आणि अमेरिकेत अडकलेल्या इतर तरुणांच्या कुटुंबीयांना दिले.

जम्मू-काश्मीरमधील व्यावसायिकांना भेटणार

काँग्रेस नेते राहुल गांधी २५ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.

विधानसभा प्रचारादरम्यानच ते या व्यावसायिकांशी संवाद साधतील, असे जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रमुख संजय सप्रू यांनी सांगितले.

सकाळी काँग्रेसमध्ये, संध्याकाळी भाजपमध्ये

केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे भाऊ जगदीश यांचे पुत्र रमित खट्टर यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु संध्याकाळ होता होता ते परत भाजपमध्ये परतले. “आपण तर चहापानासाठी गेलो होतो,” असा खुलासा रमित यांनी केला आहे.

Web Title: Rahul Gandhi reached the house of the young man he met in America early in the morning Tired of unemployment in India, the young man infiltrated America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.