रायबरेली अन् वायनाडमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधींना लाखो रुपयांचा निधी मिळाला; निवडणूक आयोगाला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 08:45 PM2024-08-29T20:45:55+5:302024-08-29T20:46:51+5:30

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना निवडणूक लढवण्यासाठी ५० लाख रुपये मिळाले. खासदार कंगना राणौत यांच्या विरोधात निवडणूक लढवताना काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना सर्वाधिक ८७ लाख रुपये मिळाले आहेत. केसी वेणुगोपाल यांना ७० लाख रुपये मिळाले.

Rahul Gandhi received lakhs of rupees to contest elections from Rae Bareli and Wayanad; Information given to Election Commission | रायबरेली अन् वायनाडमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधींना लाखो रुपयांचा निधी मिळाला; निवडणूक आयोगाला दिली माहिती

रायबरेली अन् वायनाडमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधींना लाखो रुपयांचा निधी मिळाला; निवडणूक आयोगाला दिली माहिती

केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेसच्याराहुल गांधींना पक्ष निधीतून १ कोटी ४० लाख रुपये मिळाले होते. दोन्ही ठिकाणांहून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसनेराहुल गांधींना ७०-७० लाख रुपये दिले होते. काँग्रेसने ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

मोदी सरकारसाठी आली महत्वाची बातमी; भारत या यादीत अमेरिका-चीनपेक्षाही पुढे!

पक्षाने विक्रमादित्य सिंह यांना जास्त निधी दिला. मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांना ८७ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यासमोर विक्रमादित्य सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अमेठी लोकसभा जागेवर स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेल्या काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनाही पक्षाकडून ७० लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय केरळमधील अलाप्पुझा येथील केसी वेणुगोपाल, तामिळनाडूमधील विरुधुनगर येथील मणिकम टागोर, कर्नाटकातील गुलबर्गा येथील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण आणि पंजाबमधील श्री आनंदपूर साहिबमधून काँग्रेसचे उमेदवार विजय इंदर सिंगला यांनाही प्रत्येकी ७० लाख रुपये मिळाले आहेत.

आनंद शर्मा यांना ४६ लाख आणि दिग्विजय सिंह यांना ५० लाख रुपये मिळाले. मात्र, दोन्ही नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून निवडणूक जिंकली आहे. मात्र, नंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली. ४ जून रोजी निकाल लागला. काँग्रेसने गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुका आणि अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे आपले 'आंशिक निवडणूक खर्चाचे विवरण' सादर केले होते. हा तपशील पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या एकरकमी बाबत  होता.

उमेदवार निवडणुकीत मर्यादेपर्यंतच खर्च करू शकतो. मात्र, राजकीय पक्षांबाबत तशी तरतूद नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवार ९५ लाख रुपये आणि विधानसभा निवडणुकीत ४० लाख रुपये खर्च करु शकतो. काही राज्यांमध्ये ही मर्यादा वेगळी आहे.

Web Title: Rahul Gandhi received lakhs of rupees to contest elections from Rae Bareli and Wayanad; Information given to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.