लिहून घ्या; ...म्हणून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत राहुल गांधींची भविष्यवाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:36 PM2021-03-08T16:36:37+5:302021-03-08T16:41:34+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, शिंदेंसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करत संघटन मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा, एक दिवस मुंख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी दुसरा मार्ग निवडला. (Rahul Gandhi on Jyotiraditya Scindia)
नवी दिल्ली -राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपले जुने सहकारी तथा भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदेंवर (Jyotiraditya Shinde) निशाणासाधला आहे. ते काँग्रेसमध्ये (Congress) असते तर मुख्यमंत्री झाले असते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी 'शिंदें'चे उदाहरण देत यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस संघटनेचे महत्व पटवून दिले. (Rahul Gandhi says Jyotiraditya Shinde will never be the Chief Minister in BJP)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, शिंदेंसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करत संघटन मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा, एक दिवस मुंख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी दुसरा मार्ग निवडला.
'राहुल गांधी हे सरळ अन् मोकळ्या मनाचे'; संजय राऊत यांनी भाजपावर साधला निशाणा
राहुल गांधी म्हणाले, आज शिंदे भाजपमध्ये बॅकबेंचर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "लिहून घ्या, की ते तेथे कधीच मुख्यमंत्री होणार नाही. त्यांना परत येथेच यावे लागेल." याच वेळी राहुल गांधी यांनी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आरएसएसच्या विचारधारेशी लढण्याचा आणि कशालाही न डगमगण्याचा सल्ला दिलाल.
मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या सोबतच्या वादानंतर शिंदे 11 मार्च 2020 रोजी भाजपमध्ये सामील झाले. याच बरोबर शिंदेंच्या गटातील 20 हून अधिक आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली होती. यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले होते. यानंतर जून महिन्यात शिंदे भाजपच्या तिकिटावर राज्यसभा सदस्य म्हणून निवडणून आले आहेत.