Rafale Deal: चौकीदार चोराची संपूर्ण जगात चर्चा; राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 04:27 PM2018-11-24T16:27:52+5:302018-11-24T16:34:03+5:30
राहुल गांधी राफेलच्या मुद्यावरुन मोदींवर बरसले
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राफेल डिलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. राफेल विमान खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता फ्रान्समधील जनतादेखील करत आहे. त्यामुळे आता फक्त देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात भारताचा चौकीदार चोर असल्याची चर्चा सुरू आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
राफेल प्रकरणात झालेल्या संशयास्पद व्यवहारामुळे आता फ्रान्स सरकारलादेखील संकटात सापडलं आहे. आपल्या चौकीदारानं केलेल्या चोरीनं फ्रान्स सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आता फ्रान्समधील जनतादेखील करु लागली आहे. त्यामुळे आता गल्ली-गल्लीतच नव्हे, तर संपूर्ण जगात हिंदुस्तानचा चौकीदार चोरी असल्याची चर्चा जोरात आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हमारे चौकीदार की चोरी ने, फ्रांस की सरकार को मुश्किल में डाल दिया हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 24, 2018
राफेल सौदे को लेकर अब फ्रांस की जनता जाँच की माँग कर रही है।
गली-गली तक ही नहीं, पूरे विश्व में ये शोर है, हिंदुस्तान का चौकिदार चोर है|https://t.co/2eDeErML2H
राहुल गांधी यांनी याआधीही अनेक सभांमधून पंतप्रधान मोदींवर राफेल डिलच्या मुद्यावरुन वारंवार टीका केली आहे. मोदींनी अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी राफेल करार केला. विमान निर्मिती क्षेत्रातील कोणताही अनुभव नसतानाही अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देण्यात आलं, असे आरोप राहुल यांनी अनेकदा केले आहेत. राफेलच्या मुद्यावर पंतप्रधानांनी माझ्यासोबत फक्त 15 मिनिटं चर्चा करावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं आहे.