Rahul Gandhi: सुरत सत्र न्यायालयाचा राहुल गांधी यांना धक्का, शिक्षेला स्थगिती नाही; आता हायकाेर्टात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:58 AM2023-04-21T06:58:25+5:302023-04-21T06:58:49+5:30
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून झालेल्या मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. त्याविरुद्ध राहुल गांधी उच्च न्यायालयात जाणार आहेत.
सुरत/नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून झालेल्या मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. त्याविरुद्ध राहुल गांधी उच्च न्यायालयात जाणार आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. मोगेरा यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची शिक्षेविरुद्धची याचिका फेटाळून लावली. कनिष्ठ न्यायालयाच्या २३ मार्चच्या निकालाविरुद्धच्या अपिलावर सुनावणीसाठी सत्र न्यायालयाने २० मे ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाच्या ३ एप्रिलच्या आदेशानुसार काँग्रेस नेते त्यांच्या मुख्य अपिलाचा निकाल लागेपर्यंत जामिनावर बाहेर असतील. गांधी यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की, राहुल गांधी यांनी आपल्या शब्दांबाबत अधिक सावधगिरी बाळगायला हवी होती; कारण ते संसद सदस्य होते आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राजकीय पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष होते. अपीलकर्त्यासारख्या व्यक्तीकडून उच्च नैतिकतेचा दर्जा अपेक्षित आहे. बदनामीकारक शब्द एखाद्या पीडित व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी पुरेसे आहेत.
निकाल अपेक्षितच!
n काँग्रेसचे प्रवक्ते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, सत्र न्यायालयाच्या आदेशाला लवकरच आव्हान दिले जाईल.
n राहुल गांधी यांचा आवाज
एवढ्या सहजपणे रोखला जाऊ शकत नाही. ते जनहिताचे मुद्दे उपस्थित करीत राहतील.
n राहुल गांधी यांनाही या आदेशाची अपेक्षा होती; त्यामुळे त्यांनी आधीच सरकारी निवासस्थान रिकामे केले.
राहुल गांधी यांनी आपल्या शब्दांबाबत अधिक सावधगिरी बाळगायला हवी होती. ˘- न्यायाधीश