Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 03:17 PM2022-12-31T15:17:23+5:302022-12-31T15:18:35+5:30

राहुल गांधींना थंडी वाजत नाही? आणि नसेल तर त्यामागचे कारण काय? आता यावर खुद्द राहुल गांधींनीच उत्तर दिले आहे. यामागचे रस्य त्यांनी सांगितले आहे.

Rahul Gandhi T-shirt Rahul Gandhi Bharat Jodo Yatra rahul gandhi reveals why does not he feel cold in severe winter | Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

googlenewsNext

सध्या दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असले तरी भारत जोडो यात्रा करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी सतत्याने एका टी-शर्टवरच दिसत आहेत. त्यांना अनेक वेळा विचारण्यात आले की, आपण असे का करत आहात? आणखी काही कपडे का परिधान करत नाहीत? राहुल गांधींना थंडी वाजत नाही? आणि नसेल तर त्यामागचे कारण काय? आता यावर खुद्द राहुल गांधींनीच उत्तर दिले आहे. यामागचे रस्य त्यांनी सांगितले आहे. तर जाणून घेऊयात काय आहे राहुल गांधींना थंडी न वाजण्यामागचं रहस्य?

राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? -
राहुल गांधी म्हणाले, आपण थंडीला घाबरत नाही, म्हणून आपल्याला थंडी वाजत नाही. जे लोक स्वेटर अथवा जॅकेट घालत आहेत, ते थंडीला घाबरतात. यामुळेच त्यांना थंडी वाजते. मात्र, माज्या बाबतीत असे नाही. माझी यात्राच मुळात भीती विरोधात आहे. मला भीती वाटत नाही.

राहुल म्हणाले, BJP-RSS गुरू -
याशिवाय राहुल गांधी म्हणाले, ''मी विशेषतः आरएसएस आणि भाजपच्या लोकांचे आभार मानतो. कारण ते जेवढे आक्रमण करतात, आम्हाला तेवढीच सुधारण्याची संधी मिळते. माझी इच्छा आहे, की त्यांनी त्यांच्या आक्रमानाची तीव्रता अणखी वाढवावी. यामुळे काँग्रेसला आपली विचारधारा अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. मी त्यांना (आरएसएस आणि भाजपला) आपला गुरु मानता. काय करायला हवे आणि काय नको, यासंदर्भात ते मला मार्ग दाखवतात. ते आम्हाला चांगली ट्रेनिंग देत आहेत."
 

Web Title: Rahul Gandhi T-shirt Rahul Gandhi Bharat Jodo Yatra rahul gandhi reveals why does not he feel cold in severe winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.