Rahul Gandhi : 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 03:29 PM2023-02-26T15:29:26+5:302023-02-26T15:29:32+5:30

Rahul Gandhi : ‘RSS-BJP सत्ताग्रही; मोदी-अदानी एकच…सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय.’

Rahul Gandhi: 'They will do anything for power, we will fight with truth and win...' Rahul Gandhi attacks the Centre | Rahul Gandhi : 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi : 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

googlenewsNext

Rahul Gandhi : काँग्रेसचे रायपूर अधिवेशन आज संपत आहे. शेवटच्या दिवशी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गौतम अदानी प्रकरणावर भाष्य केले. जोपर्यंत अदानीचं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू, असं ते म्हणाले. त्यांनी भाजप-आरएसएसला 'सत्ताग्रही' म्हटले तर आम्ही 'सत्याग्रही' असल्याचे सांगितले. 

राहुल गांधी म्हणाले, 'मी संसदेत एका उद्योगपतीवर हल्ला केला. मी फक्त एकच प्रश्न विचारला, मोदीजी, तुमचा अदानीजींशी काय संबंध? संपूर्ण भाजप सरकारने अदानींना संरक्षण देण्यास सुरुवात केली. अदानीजींवर हल्ला करणारा देशद्रोही आहे...अदानी आणि मोदीजी एकच आहेत. आम्ही एकदा नाही तर हजार वेळा प्रश्न विचारू, जोपर्यंत अदानींचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू,' असं राहुल म्हणाले.

'अदानी समुहाविरुद्धच्या तपासाबाबत मी समाधानी नाही. संरक्षण क्षेत्रातील शेल कंपन्यांची चौकशी होत नाहीये. पंतप्रधान त्यावर काहीच बोलले नाहीत, यावरुन पंतप्रधान त्यांना संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.' भारत जोडो यात्रेचा आणि काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदींनी भाजपच्या 15-20 जणांसह श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावला, तर आम्ही काश्मीरमधील लाखो तरुणांच्या माध्यमातून तिरंगा फडकावला,' असंही राहुल म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'एका मंत्र्याने मुलाखतीत सांगितले की, चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. मग आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा लहान होती का? म्हणजेच जे तुमच्यापेक्षा बलवान आहेत त्यांच्याशी भांडू नका. याला भ्याडपणा म्हणतात. आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीशी लढणे याला भ्याडपणा म्हणतात, हा राष्ट्रवाद नाही', अशी टीकाही त्यांनी केली.
 

Web Title: Rahul Gandhi: 'They will do anything for power, we will fight with truth and win...' Rahul Gandhi attacks the Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.