केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 15:36 IST2023-11-07T15:36:26+5:302023-11-07T15:36:46+5:30
Kedarnath Dham: केदारनाथ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आले.

केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ
Rahul Gandhi Varun Gandhi Meets:काँग्रेस नेते राहुल गांधी दोन यांनी केदारनाथमध्ये दर्शन घेतले. विशेष म्हणजे, भाजप नेते वरुण गांधीही केदारनाथमध्ये पोहोचले. यावेळी केदारनाथमध्ये दोघांची भेटही झाली. रिपोर्टनुसार, या दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. ही भेट निव्वळ योगायोग असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, दोन भाऊ अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटले.
वरुण गांधींच्या वेळापत्रकानुसार ते मंगळवारी (7 नोव्हेंबर २०२३) केदारनाथला पोहोचले, तर राहुल गांधी रविवारीच केदारनाथला पोहोचले. त्यांनी रविवारी (5 नोव्हेंबर 2023) सायंकाळी केदारनाथचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दररोज सायंकाळी होणाऱ्या आरतीमध्येही सहभाग घेतला. त्यांचा हा दौरा खासगी होता, यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता.
केदारनाथला पोहचल्यानंतर राहुल गांधींनी तिथल्या स्थानिक लोकांचीही भेट घेतली. तसेच, केदारनाथला आलेल्या संत आणि इतर भाविकांशीही चर्चा केली. यानंतर त्यांनी तेथील आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. राहुल गांधींच्या या दौऱ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.