‘भारत जोडो’त राहुल गांधींना धक्काबुक्की?; आसाम सरकार लोकांना धमकावत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:42 AM2024-01-22T08:42:44+5:302024-01-22T08:43:23+5:30

ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला

Rahul Gandhi was mobbed in Assam during Congress' Bharat Jodo Nyaya Yatra. | ‘भारत जोडो’त राहुल गांधींना धक्काबुक्की?; आसाम सरकार लोकांना धमकावत असल्याचा आरोप

‘भारत जोडो’त राहुल गांधींना धक्काबुक्की?; आसाम सरकार लोकांना धमकावत असल्याचा आरोप

विश्वनाथ चरियाली : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल यांची सुरक्षा करत त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना परत बसमध्ये नेले. ही घटना सोनीतपूरमध्ये घडल्याचा आरोप काॅंग्रेस नेत्यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते झेंडा घेत आमच्या बससमोर आले. मी उतरलो आणि ते पळून गेले. तुम्हाला पाहिजे तितके आमचे पोस्टर्स फाडून टाका. हा आमच्या विचारधारेचा लढा आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही. न्याय यात्रेच्या ताफ्यावर ४८ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. भाजपच्या लोकांनी कॅमेरामन,  दोन महिलांवर हल्ला केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

लोक घाबरत नाहीत
आसाममधील भाजपप्रणीत सरकार भारत जोडो न्याय यात्रेत सामील होऊ नका म्हणून लोकांना धमकावत असून, यात्रा मार्गावरील कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केला. धमक्यांचे सत्र सुरूच आहे, पण लोक भाजपला घाबरत नाहीत, असेही ते म्हणाले.

घोषणा देणाऱ्यांना देत राहिले फ्लाइंग किस
यात्रा सुरू होती त्यावेळी भाजपचे झेंडे घेऊन आलेल्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी घोषणा देणाऱ्यांना फ्लाइंग किस देत राहिले.

Web Title: Rahul Gandhi was mobbed in Assam during Congress' Bharat Jodo Nyaya Yatra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.