फाटका खिसा दाखवणाऱ्या राहुल गांधींनी ४१ हजारांचा टीशर्ट घातला?, भाजप काँग्रेसमध्ये तू तू-मै मै
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 05:22 PM2022-09-09T17:22:20+5:302022-09-09T17:22:51+5:30
राहुल गांधी कन्याकुमारी पासून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. १२ राज्यांमध्ये जाणारी ही भारत जोडो यात्रा ३५७० किमीचा प्रवास करेल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. १५० दिवसांच्या या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. यादरम्यान, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान भाजपवर टिकेचा बाण सोडला. तर दुसरीकडे भाजपनं पलटवार करत राहुल गांधींच्या टीशर्टचा एक फोटो शेअर केला आहे.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवरून निशाणा साधला. भाजपनं ब्रँडसोबत राहुल गांधी यांचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केलाय. या टीशर्टची किंमत ४१,२५७ रूपये असल्याचा आरोप भाजपनं केलाय. यावर भाजपनं जोरदार निशाणा साधत ‘भारत देखो’ असं म्हटलंय.
Bharat, dekho! pic.twitter.com/UzBy6LL1pH
— BJP (@BJP4India) September 9, 2022
काँग्रेसचाही पलटवार
यानंतर काँग्रेसनं पलटवार केला आहे. “भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचं बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचं आहे का?,” असं काँग्रेसनं म्हटलं.
अरे... घबरा गए क्या? भारत जोड़ो यात्रा में उमड़े जनसैलाब को देखकर।
मुद्दे की बात करो... बेरोजगारी और महंगाई पर बोलो।
बाकी कपड़ों पर चर्चा करनी है तो मोदी जी के 10 लाख के सूट और 1.5 लाख के चश्मे तक बात जाएगी।
बताओ करनी है? @BJP4Indiahttps://t.co/tha3pm9RYc— Congress (@INCIndia) September 9, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली.