राहुल गांधी ४ डिसेंबरला काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:14 AM2017-12-03T01:14:33+5:302017-12-03T01:14:48+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ४ डिसेंबर रोजी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण ५ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकेल.

Rahul Gandhi will be applying for the post of Congress president on December 4 | राहुल गांधी ४ डिसेंबरला काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार

राहुल गांधी ४ डिसेंबरला काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ४ डिसेंबर रोजी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण ५ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकेल.
राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अर्ज दाखल होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी दुपारनंतरच चित्र स्पष्ट होईल.
अर्ज दाखल केल्याच्या दुसºयाच दिवशी राहुल गांधी गुजरातकडे रवाना होतील. कारण, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ९ डिसेंबर रोजी होणार आहे. प्रचाराची मुदत संपेपर्यंत ते गुुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. ते ५ ते ७ डिसेंबरपर्यंत ते पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाºया मतदारसंघात सभा, रोड शोद्वारे प्रचार करणार आहेत.

Web Title: Rahul Gandhi will be applying for the post of Congress president on December 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.