'एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे...दोन भारत स्वीकारणार नाही', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:50 PM2022-10-07T17:50:24+5:302022-10-07T18:01:46+5:30
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi On Farmer Suicide: काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या कर्नाटकात आहे. भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) अधिक सक्रिय झाले आहेत. या यात्रेत ते भाजपविरोधात अनेक मुद्दे मांडताना दिसत आहेत. राहुल यांनी आज (7 ऑक्टोबर) ट्विट करून शेतकरी आत्महत्येचा (Farmer Suicide) मुद्दा उपस्थित केला.
कल मैं एक महिला से मिला, उनके किसान पति ने ₹50,000 के कर्ज़ के कारण आत्महत्या कर ली।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2022
एक भारत: पूंजीपति मित्रों को 6% ब्याज पर कर्ज़ और करोड़ों की कर्ज़माफ़ी
दूसरा भारत: अन्नदाताओं को 24% ब्याज पर कर्ज़ और कष्टों से भरी ज़िंदगी
एक देश में ये ‘दो भारत’, हम स्वीकार नहीं करेंगे।
पुन्हा एकदा दोन भारतांचा उल्लेख करत, राहुल गांधी म्हणाले की, ''काल (6 ऑक्टोबर) मी एका महिलेला भेटलो. तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जापाई आत्महत्या केली. एक भारत असा आहे, जिथे भांडवलदार मित्रांना 6 टक्के व्याजावर कर्ज आणि कोट्यवधींची कर्जमाफी दिली जाते. आणि दुसरा भारत असा आहे, ज्यात शेतकऱ्यांना 24 टक्के व्याजाने कर्ज आणि संकटांनी भरलेले आयुष्य आहे. या दोन भारताला आम्ही स्वीकारणार नाहीत."
राहुल गांधी गरीब बेरोजगारांना भेटले
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यापैकी बहुतांश गरीब आणि बेरोजगार लोकांचा समावेश आहे. यादरम्यान राहुल यांच्या भेटीचे अनेक फोटोही आले आहेत, ज्यांना पाहून लोक भावूक होत आहेत. अनेकजण राहुल गांधींना भेटून समस्या सांगत आहेत.
सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी झाल्या होत्या
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर रोजी केरळमधून सुरुवात झाली. 30 सप्टेंबरला ही यात्रा कर्नाटकात पोहोचली. 21 ऑक्टोबरपर्यंत यात्रा राज्यात असणार आहे. दरम्यान, काल म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांसोबत पायी प्रवास केला.