राहुल यांची ED चौकशी: राहुल गांधींकडे 16 कोटींची संपत्ती, स्वतःची कार नाही; 72 लाखांचं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:10 PM2022-06-14T16:10:18+5:302022-06-14T16:12:04+5:30
सध्या अंमलबजावणी संचालनालय (ED) नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. हे प्रकरण तब्बल 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे आहे.
सध्या अंमलबजावणी संचालनालय (ED) नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. हे प्रकरण तब्बल 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे आहे. काँग्रेसने आपल्या पक्षनिधीतून या वृत्तपत्राला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले होते.
ईडी राहुल गांधी यांच्याकडे त्यांच्या संपत्तीसंदर्भातही विचारणा करत आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राहुल यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, त्यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांची संपत्ती आणि 72 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे म्हटले गेले आहे. याच प्रतिज्ञापत्रानुसार आज आम्ही आपल्याला राहुल गांधी यांच्या संपत्तीसंदर्भात माहिती देत आहोत.
राहुल गांधी यांच्याकडे 15 कोटींहून अधिकची संपत्ती -
- 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांपेक्षाही अधिक संपत्ती आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 9.4 कोटी होती.
- राहुल गांधी यांच्यावर 72 लाख रुपयांचे कर्जही आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची कारही नीही.
- राहुल गांधी यांची चल संपत्ती 5 कोटी 80 लाख 58 हजार 799 रुपये आणि अचल संपत्ती 10 कोटी 8 लाख 18 हजार 284 रुपये एवढी आहे.
- त्यावेळी त्यांच्याकडे 40 हजार रुपये कॅश आणि 17 लाख 93 हजार रुपये वेगवेगळ्या बँकांमध्ये होते.
- त्यावेळी त्यांनी 5 कोटी 19 लाख रुपये बॉन्ड, शेअर म्यूच्युअल फंडमध्ये इंव्हेस्ट केले होते.
- सुल्तानपूरमध्ये वारशाने मिळालेल्या शेतीत त्यांचा वाटा आहे.
- राहूल गांधी यांच्याकडे तेव्हा 333.3 ग्रॅम सोने होते.
- 2017-18 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 11 लाख 85 हजार 570 रुपये एवढे होते.
राहुल गांधी यांच्या उत्पन्नाचे सोर्स -
- खासदार म्हणून मिळणारी सॅलरी
- रॉयल्टी इन्कम
- रेंटल इन्कम
- बॉन्ड्समधून मिळणारे व्याज
- म्युच्युअल फंड्समधून मिळणारे डिव्हिडन्स आणि कॅपिटल गेन
50 लाख रुपयांच्या शेअर्ससाठी पैसे कसे जमवले? ED नं राहुल गांधींना केले असे प्रश्न -
-आपली संपत्ती कुठे-कुठे आहे? परदेशात काही संपत्ती आहे का? जर असेल, तर कुठे आणि किती?
- एजेएलमध्ये आपली भूमिका काय होती आणि आपण यंग इंडियाशी कसे जोडले गेलात?
-आपण यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी केव्हा आणि किती रुपयांत स्थापन केली?
- यंग इंडिया AJL चे टेकओव्हर करू शकते?
- आपण AJL चे 50 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले, यासाठी पेमेंट कशा पद्धतीने करण्यात आले होते?
- यात आपला वाटा किती होती? आपण आपले शेअर्स कसे आणि किती रुपयांत खरेदी केले? यासाठी पैसे कुठून आले?
- AJL टेक ओव्हर केल्यानंतर तिच्यावरील 90.9 कोटी रुपयांचे कर्ज माफ का केले?
- काँग्रेसने नॅशनल हेराल्डला 90.9 कोटी रुपयांचे कर्ज दिले, पण आपण शेअर्स मात्र आपल्या नावाने घेतले?
- नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागचा हेतू काय होता?