राहुल गांधीच्या उपोषणाचे 'वाजले की बारा', काँग्रेस अध्यक्ष अद्याप राजघाटावर पोहोचलेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 12:40 PM2018-04-09T12:40:36+5:302018-04-09T12:41:05+5:30
देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे मोठा गाजावाजा करत आज एका दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे मोठा गाजावाजा करत आज एका दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध भागात काँग्रेसचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. मात्र या उपोषणाचा मुख्य कार्यक्रम होत असलेल्या राजघाटावर मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजघाटावर येऊन सकाळी 10 वाजता उपोषणाला बसतील असे सांगण्यात आले होते. मात्र बारा वाजून गेले तरी राहुल गांधी हे उपोषणस्थळापर्यंत पोहोचले नसल्याने काँग्रेस आणि राहुल गांधींच्या उपोषणाचे वाजले की 12 म्हणायची वेळी आली आहे.
दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने सोमवारी सकाळी सामूहिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत उपोषणाला बसतील, असे सांगण्यात आले होते. मात्र काँग्रेस अध्यक्ष अद्याप राजघाटावर पोहोचलेले नाहीत. आता दुपारी 1 च्या सुमारास राहुल गांधी राजघाटावर येतील, असेे सांगण्यात येत आहे.