पीएम मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा भव्य रोड शो; प्रियंका गांधीही असणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 19:44 IST2024-02-14T19:43:44+5:302024-02-14T19:44:21+5:30
Rahul Gandhi: काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा वाराणसीत दाखल होणार आहे.

पीएम मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा भव्य रोड शो; प्रियंका गांधीही असणार उपस्थित
Rahul Gandhi Road Show in Varanasi:राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो न्याय 17 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पोहचले. शहरात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींचा येथे भव्य रोड शो होईल आणि त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील. विशेष म्हणजे, वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.
वाराणसीतील या रोड शोमध्ये राहुल गांधींसोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही सहभागी होणार आहेत. समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादवही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या सहभागावरुन अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही याकडे पाहिले जात आहे.
काँग्रेसची यात्रा चांदौलीतून वाराणसीत दाखल होणार
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 17 फेब्रुवारीला चंदौलीहून वाराणसीला पोहोचेल. यावेळी त्यांचा भव्य रोड शो होईल. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यानंतर राहुल काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करतील.