राहुल गांधींच्या सभेवेळी सिद्धूना बोलण्यापासून रोखले; म्हणाले जागा दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 10:42 AM2019-03-09T10:42:28+5:302019-03-09T10:43:06+5:30

राहुल गांधी यांची कर्जमाफीच्या योजनेसाठी मोगा येथे रॅली आयोजित केली होती. यावेळी सिद्धूही उपस्थित होते.

Rahul Gandhi's meeting prevented Siddhu from speaking; Said they show my place | राहुल गांधींच्या सभेवेळी सिद्धूना बोलण्यापासून रोखले; म्हणाले जागा दाखवली

राहुल गांधींच्या सभेवेळी सिद्धूना बोलण्यापासून रोखले; म्हणाले जागा दाखवली

Next

चंदीगढ : पंजाबमधील मोगा येथील राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना बोलण्यापासून रोखण्यात आले होते. यावरून सिद्धू नाराज झाले असून काँग्रेसने माझी जागा दाखविल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. 


राहुल गांधी यांची कर्जमाफीच्या योजनेसाठी मोगा येथे रॅली आयोजित केली होती. यावेळी सिद्धूही उपस्थित होते. या सभेचे आयोजन मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी केले होते. यावेळी सिद्धू यांना भाषण देण्यास मनाई करण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी, 'जर मी राहुल गांधी यांच्या सभेमध्ये बोलण्यासाठी योग्य नसेन, तर एक प्रवक्ता किंवा प्रचारक म्हणूनही अयोग्य आहे. पुढील काळात मला बोलण्यासाठी बोलावले जाते किंवा नाही, पण या सभेने मला माझी जागा दाखवून दिली आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणुकीसाठी कोण कोण प्रचार करणार याबाबत माहिती नसल्याचेही सांगितले. 


दरम्यान, आयोजक सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी भाषणासाठी केवळ 4 जणांची नावे देण्यास सांगितले होते. यानंतर राहुल गांधी यांना कांगडा येथील सभेला जाण्यास उशिर होत आहे, यामुळे जाखड, आशा कुमारी आणि राहुल गांधीच भाषण करतीस असे सांगण्यात आले. 


सिद्धू यांनी 2004 मधील असाच एक प्रकारही सांगितला. तेव्हा सुखविंदरसिंग बादल यांच्या सभेमध्येही मला बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बालाकोट हल्ल्यावरून टीका करणार होतो. याची तयारीही केली होती. सुनील जाखड यांनीही सांगितले की, सिद्धूना भाषण द्यायला परवानगी द्यायला हवी होती. 

कर्जमाफीची योजना जाहीर केली
राहुल गांधी यांनी गुरुवारी मोगा येथे कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा लाँच केला. यावेळी त्यांनी या भागातील 13 लोकसभा जागांवर काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच देशात सत्ता आली तर मनरेगासारखीच किमान उत्पन्न योजना सुरु करणार असल्याचे आश्वासनही दिले. 

Web Title: Rahul Gandhi's meeting prevented Siddhu from speaking; Said they show my place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.