आधी पावसातले भाषण, आता राहुल गांधीचा पाण्याच्या टाकीवरील व्हिडिओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:23 AM2022-10-14T11:23:51+5:302022-10-14T11:37:30+5:30
काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकात सुरू आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकात सुरू आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात्रेतील राहुल गांधी यांचे फोटोसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याअगोदर त्यांचे पावसातील भाषण व्हायरल झाले होते, आता पाण्याच्या टाकीवर भारताचा झेंडा घेतलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
काँग्रेसची भारत जोडे यात्रा आज कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी येथील एक पाण्याची टाकी पाहिली. यानंतर ते काँग्रेस नेत्यांसोबत पाण्याच्या टाकीवर चढले. यावेळी राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसोबत पाण्याच्या टाकीवर तिरंगा फडकवला. यावेळी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार हे उपस्थित होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
काल राहुल गांधी यांनी कर्नाटकातील चित्रदुर्गातील मोलाकलमुरू येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. “आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचे विभाजन आणि द्वेष पसरवू देणार नाही. या देशाचे विभाजन करणे या देशाच्या हिताच्या विरोधात आहे. यामुळे देश बलवान नाही तर कमकुवत होईल, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
हर ऊंचाई पर तिरंगा लहराए 🇮🇳 pic.twitter.com/QLTwSLNU3B
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2022
बेरोजगारी आणि भाषेवरूनही राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आज देशात गेल्या ४५ वर्षांतील सर्वात जास्त बेरोजगारी दर आहे. कर्नाटकातील तरुण कन्नड भाषेत परीक्षा का देऊ शकत नाहीत. भाषा हा इतिहास आहे, ती संस्कृती आहे, ती काल्पनिक आहे आणि त्यांच्या भाषेत बोलण्यापासून कोणालाही रोखू नये.भाषेचा आदर केला जाऊ नये, असा प्रचार भाजप आणि आरएसएस करत आहे. पण आपण सर्वच भाषेचा आदर करतो आणि कन्नड भाषेला आपल्यासाठी खूप महत्त्व आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.