दुर्ग्याणा मंदिरला राहुल गांधींची भेट, स्वागताला एकही खासदार नव्हता हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 06:06 AM2022-01-28T06:06:02+5:302022-01-28T06:06:59+5:30
अमृतसरमध्ये गांधी यांचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी व काँग्रेसच्या उमेदवारांनी विमानतळावर स्वागत केले.
बलवंत तक्षक
चंडीगड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मिशन पंजाब’ला प्रारंभ केला आहे. गांधी यांचे गुरुवारी अमृतसरमध्ये विशेष विमानाने आगमन झाले. त्यांनी सुवर्ण मंदिरात माथा टेकला आणि पंगतमध्ये बसून जेवण केले. नंतर त्यांनी श्री दुर्ग्याणा मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थमध्येही माथा टेकला.
अमृतसरमध्ये गांधी यांचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी व काँग्रेसच्या उमेदवारांनी विमानतळावर स्वागत केले. राहुल गांधी यांनी जलियांवाला बागेत जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसने राज्याच्या ११७ जागांच्या विधानसभेसाठी १०९ उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधी पंजाबमध्ये यायच्या आधी पक्षाची तिसरी यादी जाहीर होईल, अशी आशा होती. हवामान अनुकूल नसल्यामुळे राहुल गांधी नियोजित वेळेनंतर अमृतसरमध्ये आले. राहुल गांधी अमृतसरमध्ये विमानतळावर आले तेव्हा पक्षाचे राज्यातील ५ खासदार मनीष तिवारी, रवणीत सिंग, जसबीर सिंग गिल, प्रिनीत कौर आणि मोहम्मद सादिक तेथे स्वागताला हजर नव्हते.
निश्चितच गेलो असतो
n या गैरहजेरीबद्दल जसबीर सिंग गिल म्हणाले की, “तेथे जायला आम्हाला काहीही अडचण नव्हती.
n तो कार्यक्रम हा ११७ उमेदवारांबाबत आहे, असे आम्हाला समजले होते.
n आम्हाला ना प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी बोलावले ना मुख्यमंत्र्यांनी ना प्रभारी महासचिवांनी.
n आम्हाला जर निमंत्रित केले गेले असते तर आम्ही निश्चितच गेलो असतो.”