मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 03:33 PM2020-05-28T15:33:12+5:302020-05-28T16:03:06+5:30
काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
नवी दिल्ली : लॉकडाउच्या मुद्यावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर ट्रिपल अॅटॅक केला.
काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
सरकार समजून घ्यायलाच तयार नाही -
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देश फाळणीनंतरच्या सर्वात मोठ्या अरिष्टातून जात आहे. गरीब, मजूर, छोटे व्यापारी आणि शेतकरी चिंतित आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती त्यांना होणारा त्रास अनुभवत आहे. मात्र, सरकारवर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. आम्ही सरकारला वारंवार सूचना केल्या मात्र, सरकार समून घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता काँग्रेसने भारताचा आवाज उंचावण्याचा विडा उचलला आहे. सरकारने तत्काळ आपला खजिना खुला करून गरिबांना मदत करायला हवी.’
40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'
LIVE: Congress President Smt. Sonia Gandhi's message to the people & the BJP govt. #SpeakUpIndiahttps://t.co/OqpYFaU6AD
— Congress (@INCIndia) May 28, 2020
सरकारने गरिबांच्या बँक खात्यात पुढील 6 महिने 7,500 रुपये टाकायला हवेत. मनरेगाअंतर्गत वर्षाला 100 दिवसांऐवजी 200 दिवस काम द्यायला हवे. एमएसएमई क्षेत्रासाठी तत्काळ निधीची घोषणा करण्यात यावी. तसेच सरकारने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचीही व्यवस्था करावी, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.
गरिबांचे नुकसान -
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "मजुरांना भुकेल्यापोटी हजारो किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. देशाला मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे उद्योग धंदे एका पाठोपाठ एक बंद होत आहेत. भारताला कर्जाची आवश्यकता नाही. आज देशाला पैशांची आवश्यकता आहे. गरीब जनतेला पैशांची आवश्यकता आहे. यामुळे काँग्रेस सरकारसमोर चार मागण्या ठेवत आहे."
युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज
It's time for every Indian to stand together & speak up in one voice. #SpeakUpIndia
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2020
for our brothers & sisters struggling for survival;
for those whose voice has been silenced;
for those in despair & are fearful.
We are India.
Together we can make a difference. pic.twitter.com/7Q6R2rcWuP
महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न -
काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी म्हणाल्या, "गरिबांच्या खात्यात तत्काळ 10 हजार रुपये टाकले गेले पाहीजे. मी विषेश करून भाजपाला सांगते, की राजकारण करू नका. ही वेळ सर्वांनी मिळून गरिबांना साथ देण्याची आहे. विचारधारा बाजूला ठेवण्याची आहे. उत्तर प्रदेश सरकारने बसेसवरून राजकारण केले. महाराष्ट्रात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातील जनता त्रस्त आहे. सरकार त्यांना मदत करत नाहीये. आम्ही मानवतेच्या आधारावर ही मागणी करत आहोत. आपण सर्वांनीच या दुःखाच्या प्रसंगात त्यांची साथ द्यायला हवी.’
LIVE: AICC General Secretary Smt. @priyankagandhi's message to the people & the BJP govt. #SpeakUpIndiahttps://t.co/xRBVR4Wije
— Congress (@INCIndia) May 28, 2020
POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता