"राहुलजी तुमचा लष्करावर विश्वास नाही काय?" लडाख प्रश्नावरून रिजीजूंचा बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 07:29 PM2020-06-09T19:29:02+5:302020-06-09T19:47:53+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नवी दिल्ली - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्याने सध्या या परिसरात कमालीची तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र दुसरीकडे देशात लडाखमधील परिस्थितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान आता केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधीचे हे विधान बेजबाबदारपणाचे असून, ज्याचा लष्कराच्या क्षमतेवर विश्वास नाही, अशीच व्यक्ती असे विधान करू शकतो, असा टोला लगावला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. संरक्षणमंत्र्याची हात छाप टिप्पणी पूर्ण झाली असेल तर त्यांनी सांगावे की चीनने लडाखमधील भारतीय भूमीवर कब्जा केला आहे का?
दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावर किरेन रिजिजू यांनी जोरदार पलटवार केला आहे. "जेव्हा राजकीय फायदा हा राष्ट्रहितापेक्षा मोठा वाटू लागतो, तसेच कुणी व्यक्ती स्वतःच्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवणे बंद करतो, तेव्हा अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली जातात. अपेक्षा करतो की कुणीतरी १९६२ मध्ये केलेल्या चुकांचे आत्मचिंतन करेल,'' अशी बोचरी टीका रिजिजू यांनी केली आहे.
इस तरह के गैरजिम्मेदाराना बयान और व्यवहार तब सामने आते हैं जब कोई खुद की सेना पर भरोसा करना बंद कर देता है और राजनीतिक हित राष्ट्रीय हित से आगे निकल जाता है।
— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 9, 2020
Hope someone realises blunder of 1962 which pushed NEFA (Arunachal Pradesh) into other's needless & unjustified claim. https://t.co/MpzwZ2VhpE
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे. चिनी सैन्यानं त्यांची वाहनंदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानंदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप