'राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देतायत, भाजपाला भीती वाटतेय'; अशोक गहलोत यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 02:16 PM2023-08-07T14:16:06+5:302023-08-07T14:16:20+5:30

राहुल गांधी आज सकाळी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी काँग्रसच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Rajasthan CM Ashok Gehlot has said that the BJP is afraid of the response to MP Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra. | 'राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देतायत, भाजपाला भीती वाटतेय'; अशोक गहलोत यांचं विधान

'राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देतायत, भाजपाला भीती वाटतेय'; अशोक गहलोत यांचं विधान

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचनाही लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा आणि शिक्षा रद्द केली. त्यामुळे त्यांचा संसदेच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळाल्याने काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यामुळे राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.  

राहुल गांधी आज सकाळी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी काँग्रसच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल केल्यानंतर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक गहलोत म्हणाले की, संपूर्ण देशभरात एक मोठा मेसेज गेला आहे. हा सर्व प्रकार भाजपाच्या नेत्यांनी घडवून आणला होता. भाजपाला राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरुन भीती होती. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देत असेल, तर ते म्हणजे राहुल गांधी आहेत, असंही अशोक गहलोत यांनी सांगितले. 

दरम्यान, कमाल शिक्षेमुळे राहुल गांधी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींच्या कक्षेत आले. जर शिक्षा एका दिवसाने कमी असती, तरी तरतुदी लागू झाल्या नसत्या. अपिलीय न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दोषसिद्धीवरील स्थगिती बाजूला ठेवण्यासाठी बरीच पृष्ठे खर्ची घातली. मात्र, त्यांच्याही आदेशात या पैलूंचा विचार केला गेला नाही. राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आले आणि त्यानंतर संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले गेल्याने केवळ सार्वजनिक जीवनात राहण्याच्या त्यांच्या अधिकारावरच गदा आली नाही, तर ज्यांनी त्यांना आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले होते, त्या मतदारांच्या हक्कावरही परिणाम झाला.

Web Title: Rajasthan CM Ashok Gehlot has said that the BJP is afraid of the response to MP Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.