Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:11 AM2020-07-15T10:11:21+5:302020-07-15T10:21:00+5:30

Rajasthan Political Crisis: मी स्वत: अशोक गहलोत यांच्याशी या विषयावर बोललो आहे. पण जेव्हा मंत्री आणि आमदारांची बैठक होत नव्हती तेव्हा वादविवाद आणि चर्चेला वाव राहिला नाही.

Rajasthan Political Crisis: Will you join BJP? Sachin Pilot made it clear that | Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...

Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...

Next
ठळक मुद्देमाझा स्वाभिमान दुखावला आहे. राज्य पोलिसांनी मला देशद्रोहाची नोटीस दिलीमी जे पाऊल उचलले ते अन्याय विरुद्ध होतेराजस्थानमध्ये कॉंग्रेसला जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे

जयपूर – राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं, त्यानंतर काँग्रेसने भाजपावर आरोप करत सरकार अस्थिर करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत असल्याचा आरोप केला. या संपूर्ण घडामोडीत सचिन पायलट यांची प्रतिक्रिया कुठेही आली नव्हती.

राजकीय संघर्षात इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट यांनी सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ते भाजपाच्या संपर्कात नसून भाजपात प्रवेश करणार नाहीत. या मुलाखतीत सचिन पायलट काय म्हणाले जाणून घेऊया.(Rajasthan Political Crisis)

प्रश्न – तुम्ही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहात का?

उत्तर – मी नाराज नाही किंवा मी जास्त काही मागितलंही नाही, काँग्रेसने राजस्थानमधील जनतेला निवडणुकीवेळी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करावीत इतकीच माझी इच्छा होती. आम्ही वसुंधरा राजे यांच्याविरोधात प्रचार केला होता. अवैध माइनिंग प्रकरणात काँग्रेसचं सरकार आल्यानंतरही काही केले नाही. मुख्यमंत्री अशोक गहलोत त्यांच्या मार्गाने चालले होते, गेल्या वर्षी राजस्थान उच्च न्यायालयाने पूर्वीचा निर्णय बदलून वसुंधरा राजे यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले, परंतु अशोक गहलोत सरकारने हा निर्णय लागू करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. एकीकडे अशोक गहलोत हे माजी मुख्यमंत्र्यांना मदत करत आहेत आणि दुसरीकडे ते मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासात काम करण्याची संधी देत नाहीत. माझ्या आदेशाचे पालन करू नका, फाइल्स माझ्याकडे पाठवू नका असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. काही महिन्यांपासून विधिमंडळ पक्ष किंवा मंत्रिमंडळाची बैठक होत नाही. मी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाही तर अशा पदाचा काय उपयोग?

प्रश्न - तुम्ही पक्ष पातळीवर हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत?

उत्तर - मी हे मुद्दे बर्‍याच वेळा सर्वांसमोर ठेवले आहेत. मी प्रभारी अविनाश पांडे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी बोललो, मी स्वत: अशोक गहलोत यांच्याशी या विषयावर बोललो आहे. पण जेव्हा मंत्री आणि आमदारांची बैठक होत नव्हती तेव्हा वादविवाद आणि चर्चेला वाव राहिला नाही.

प्रश्न - विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बोलविली असता, तुम्ही गेला नाही. तिथेही प्रश्न उपस्थित करता आले असते का?

उत्तर - माझा स्वाभिमान दुखावला आहे. राज्य पोलिसांनी मला देशद्रोहाची नोटीस दिली. आपल्याला आठवत असेल तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही हा कायदा हटवण्याबद्दल बोलत होतो, आणि येथे कॉंग्रेस सरकार अंतर्गत त्यांच्या स्वतःच्या मंत्र्याला नोटीस देत आहे. मी जे पाऊल उचलले ते अन्याय विरुद्ध होते. आणि जर व्हिपची बाब असेल तर ती केवळ विधानसभेच्या सभागृहासाठी कामाला येते, मुख्यमंत्र्यांनी ही बैठक पक्षाच्या कार्यालयात नव्हे तर त्यांच्या घरात बोलविली होती.(Rajasthan Political Crisis)

प्रश्न - तुम्ही भाजपासोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होता असा आरोप अशोक गहलोत यांनी केला आहे.

उत्तर - या दाव्यांमध्ये काही तथ्य नाही. राजस्थानमध्ये कॉंग्रेसला जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, मी पक्षाच्या विरोधात काम का करणार?

प्रश्नः आता तुमची हकालपट्टी केली आहे. मग तुम्ही कॉंग्रेसमध्ये कसे पुढे जाल?

उत्तर - सध्या वातावरण शांत होऊ द्या..अद्याप 24 तास झाले नाहीत. मी अजूनही कॉँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या समर्थकांशी पुढील भूमिकेवर चर्चा केली पाहिजे.

प्रश्न - तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत असं भाजपा सांगत आहे.

उत्तर – मी पहिल्यांदा स्पष्ट करतो की, मी भाजपात प्रवेश करणार नाही, मला लोकांसाठी काम करायचे आहे इतकचं आता सांगू शकतो. (Sachin Pilot)

प्रश्न - तुम्ही भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहात का? ओम माथूर किंवा ज्योतिरादित्य शिंदे तुम्हाला भेटले का?

उत्तर - मी भाजपाच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. मी गेल्या ६ महिन्यांपासून ज्योतिरादित्य शिंदे भेटलो नाही आणि ओम माथूरला यांनाही भेटलो नाही.(Rajasthan Political Crisis)

प्रश्न - मुख्यमंत्री होणे आपल्यासाठी इतके महत्वाचे का आहे? आपला पक्ष म्हणतो की, इतक्या लहान वयात तुम्हाला बरीच पदे देण्यात आली आहेत, तुम्ही महत्वाकांक्षी आहात का?

उत्तर - २०१८ मध्ये मी पक्षाच्या विजयाचं नेतृत्व केले तेव्हा मी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोललो होतो. माझ्याकडे योग्य युक्तिवाद होते. जेव्हा मी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा २०० पैकी २१ जागांवर पक्ष आला होता. मी पाच वर्षे काम केले आणि गेहलोतजी एक शब्दही बोलले नाहीत. पण निवडणुकीतील विजयानंतर लगेत अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. अनुभवाच्या मुद्यावर म्हणाल तर त्यांचा अनुभव काय आहे? २०१८ च्या आधी ते दोनदा मुख्यमंत्री झाले आहेत, दोन निवडणुकांत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष ५६ आणि २६ पर्यंत पोहोचला. यानंतरही त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आले. होय, मी राहुल गांधींचा निर्णय स्वीकारला आणि ते मुख्यमंत्री झाले. राहुलच्या सांगण्यावरून मी उपमुख्यमंत्रीही झालो. राहुल गांधींनी सत्तेत समानता आणण्याविषयी सांगितलं पण गहलोत यांनी मला बाजूला सारले.

प्रश्न - राहुल गांधींनी या प्रकरणात हस्तक्षेप केला का? आपण त्याच्याशी बोलला का?

उत्तर - राहुल गांधी आता कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. राहुल यांनी राजीनामा दिल्यावर गहलोत आणि त्यांच्या एआयसीसी सहकाऱ्यांनी माझ्या विरोधात मोर्चा उघडला. तेव्हापासून माझा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झाला

प्रश्न - गांधी कुटुंबियांनी तुमच्याशी संवाद साधला का? आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे?

उत्तर - मला सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी काही देणेघेणे नाही. प्रियांका गांधी माझ्याशी बोलल्या, पण ती खासगी चर्चा होती. त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही.

प्रश्न - तुमच्या मागण्या काय आहेत? आपण मुख्यमंत्रीपदासाठी आणि मंत्र्यांसाठी जागा मागत होता का?

उत्तर - मी अशी कोणतीही मागणी केलेली नाही. माझी फक्त अशी इच्छा होती की, मला आश्वासन दिल्याप्रमाणे स्वाभिमानाने काम करण्याची जागा मिळेल. मला पुन्हा सांगायचे आहे की ही सत्तेची गोष्ट नाही तर स्वाभिमानाची गोष्ट आहे.

Read in English

Web Title: Rajasthan Political Crisis: Will you join BJP? Sachin Pilot made it clear that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.