Rajya Sabha Election Result: मोठा गेम झाला! राहुल गांधींच्या एका निकटवर्तियाने दुसऱ्या निकटवर्तियाचा पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:19 PM2022-06-11T13:19:58+5:302022-06-11T15:16:07+5:30

Rajya Sabha Election Result २०२२: हरयाणात काँग्रेसला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ असूनही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या या पराभवाचे कारण राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे कुलदीप बिश्नोई ठरले. तर पराभूत होणारे उमेदवार काँग्रेसचे दिल्लीतील बडे नेते अजय माकन ठरले.

Rajya Sabha Election Result: One of Rahul Gandhi's knights defeated the other knight | Rajya Sabha Election Result: मोठा गेम झाला! राहुल गांधींच्या एका निकटवर्तियाने दुसऱ्या निकटवर्तियाचा पराभव केला

Rajya Sabha Election Result: मोठा गेम झाला! राहुल गांधींच्या एका निकटवर्तियाने दुसऱ्या निकटवर्तियाचा पराभव केला

Next

चंडीगड - चार राज्यांमध्ये झालेल्या राज्यसभेच्या १६ जागांसाठीच्या निवडणुकीत सनसनाटी निकाल लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणामधील निकाल हा भाजपासाठी दिलासा देणारा तर विरोधकांना धक्का देणारा ठरला आहे. यामध्ये हरयाणात काँग्रेसला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ असूनही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या या पराभवाचे कारण राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे कुलदीप बिश्नोई ठरले. तर पराभूत होणारे उमेदवार काँग्रेसचे दिल्लीतील बडे नेते अजय माकन ठरले. तेसुद्धा राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. अगदी अटीतटीच्या लढतीत माकन यांना भाजपाच्या पाठिंब्यावर लढत असलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी पराभूत केले.

रिटर्निंग ऑफिसर आर.के. नंदल यांनी सांगितले की, भाजपाचे कृष्णलाल पवार यांना ३६ मते मिळाली. तर कार्तिकेय शर्मा यांना पहिल्या प्राधान्यक्रमाची २३ मते मिळाली. तर ६.६ टक्के मते ही भाजपाकडून त्यांना ट्रान्सफर झाली. त्यामुळे त्यांची एकूण मतसंख्या २९.६ एवढी झाली. अजय माकन यांना २९ मते मिळाली. मात्र दुसऱ्या प्राधान्यक्रमाचं एकही मत न मिळाल्याने माकन यांचा पराभव झाला.

राज्यसभा निवडणुकीत एक मत हे १०० च्या बरोबरीचे मानले जाते. हरियाणामध्ये एकूण ९० आमदारांमधील ८९ आमदारांनी मतदान केले. तर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. निवडणूक आयोगाने काँग्रेसचं एक मत रद्द केलं होतं. त्यामुळे ८८ मतं उरली होती. ८८०० एवढं त्याचं मतमूल्य होतं.

त्यामुळे विजयासाठी ८८००/३+१ म्हणजेच २९३४ मतांची गरज होती. भाजपाचे कृष्णलाल पवार यांच्या विजयानंतर ६६ मतं उरली. ती कार्तिकेय शर्मा यांना ट्रान्सफर करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना प्रत्येकी २९ मते मिळाली. इथपर्यंत दोघेही बरोबरीत होते. मात्र भाजपाला ६६ मतं मिळाल्यानंतर कार्तिकेय यांची मतं २९६६ झाली त्यामुळे त्यांचा विजय झाला. काँग्रेसमधील क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध झाल्याने संपूर्ण बाजीच पलटून गेली. 

Web Title: Rajya Sabha Election Result: One of Rahul Gandhi's knights defeated the other knight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.