मारुतीरायाच्या मूर्तीसमोरच बिकिनीमध्ये महिला बॉडी बिल्डर्सचा रॅम्पवॉक व्हिडीओ व्हायरल होताच मोठा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:42 AM2023-03-06T10:42:38+5:302023-03-06T10:44:19+5:30
Womens Bodybuilder Vulgar Ramp Walk: मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेवरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. ही एक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा होती. या स्पर्धेत महिला स्पर्धक सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेवरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. ही एक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा होती. या स्पर्धेत महिला स्पर्धक सुद्धा सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या महिला स्पर्धकांनी मारुतीच्या मूर्तीसमोर टू पीसमध्ये रँपवॉक आणि डान्स केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
या मुद्यावरून काँग्रेसनेभाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपावर अश्लीलता पसरवण्याचा आणि भारतीय संस्कृतीची थट्टा केल्याचा आरोप केला आहे. हिंदू संघटनांनीही या प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर काँग्रेस आज कॉम्पिटिशन हॉलमध्ये सुंदरकांड पठण करणार आहे. तसेच हॉल गंगाजल शिंपडून पवित्र करणार आहे.
रतलाममध्ये ५ मार्चला झालेली बॉडी बिल्डिंग स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. भाजपावर मारुतीरायासमोर अश्लीलता पसरवल्याचा आरोप झाला आहे. हे आयोजन रतलामचे महापौर प्रल्हाद पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केले होते. या प्रकाराबाबत सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
रतलाम महापौर के मुख्य आतिथ्य में भगवान हनुमान जी की मूर्ति रखकर अश्लील प्रदर्शन वह भी मुख्यमंत्री जी के जन्मदिन के मौके पर।सनातन संस्कृति को बेचखाने वाले इस नेता पर क्या कार्यवाही होगी शिवराज जी? @BJP4India@OfficeOfKNath@digvijaya_28@inc_jpagarwalpic.twitter.com/Xebc6dLKOW
— Bhupendra Gupta Agam (@BhupendraAgam) March 5, 2023
दुसरीकडे मंचावर बजरंगबलीच्या मूर्तीसमोर महिला स्पर्धकांनी केलेल्या अंगप्रदर्शनावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने हा कार्यक्रम अश्लीलता पसरवणारा आणि भारतीय संस्कृती विरोधी असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आता हा कार्यक्रम झाला तिथे सुंदरकांड पठण करणार आहे. तसेच ते ठिकाण गंगाजल शिंपडून पवित्र करणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यावरून लोक आयोजन समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काँग्रेस नेते पारस संकलेचा यांनी हा भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला, असेही त्यांनी म्हटले आहे.