‘पत्नीची इच्छा नसताना संबंध हा अत्याचारच’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:00 AM2024-01-03T08:00:34+5:302024-01-03T08:01:03+5:30

२००९ मध्ये पीडितेचे लग्न झाल्यावर ती पतीसह नोकरीसाठी परदेशात गेली. तेथे गेल्यापासून पतीकडून जबरदस्ती केली जात होती.

Relationship without wife's will is torture | ‘पत्नीची इच्छा नसताना संबंध हा अत्याचारच’

‘पत्नीची इच्छा नसताना संबंध हा अत्याचारच’

तिरुवनंतपुरम : पत्नीची इच्छा व सहमतीविना तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती करणे, हे शारीरिक व मानसिक क्रूरतेप्रमाणे असल्याचे मत केरळउच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच पतीच्या जाचाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या महिलेला पतीपासून घटस्फोट मंजूर केला.

२००९ मध्ये पीडितेचे लग्न झाल्यावर ती पतीसह नोकरीसाठी परदेशात गेली. तेथे गेल्यापासून पतीकडून जबरदस्ती केली जात होती. मागणी पूर्ण न केल्यास मारहाण केली जात होती. पतीविरोधात तक्रार केल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले होते. 

Web Title: Relationship without wife's will is torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.