राजीव गांधींनी दिलेलं तेच 'रियल गिफ्ट', केरळमधील माजी मंत्र्यांच्या लग्नाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:09 PM2021-06-15T17:09:28+5:302021-06-15T17:10:24+5:30
रमेश चेन्नीथला हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून केरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे.
तिरुवअनंतपूरम - केरळमधीलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमि आमदार रमेश चेन्नीथला यांनी आपल्या लग्नाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रमेश यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला असून त्यामध्ये दिवंगत पंतप्रधान काँग्रेस नेते राजीव गांधी दिसत आहेत. राजीव गांधींकडून रमेश यांना लग्नानिमित्त गिफ्ट देण्यात आलं होत, त्यासंदर्भातील आठवणी रमेश यांनी ट्विटरवरुन सांगितल्या आहेत.
रमेश चेन्नीथला हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून केरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. तर, केरळच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदही भूषवले आहे. 4 वेळा खासदार आणि 5 वेळा आमदार बनून त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यासोबतच, विविध समित्यांवरही त्यांची नियुक्ती झाली होती. सद्यस्थितीत ते हरीप्पड येथील विद्यमान आमदार आहेत.
Rajiv Gandhiji was the leader who mentored me to be National politician. Rajivji, then PM attended my wedding reception at Kerala House.The real gift was not the ring he gifted. But it was what he said to me.
— Ramesh Chennithala (@chennithala) June 15, 2021
"You have been appointed as State
President of IYC"#DownMemoryLanepic.twitter.com/uM0D3XEyYa
रमेश यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी जागवल्या आहेत. लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. त्यामध्ये, तत्काली पंतप्रधान दिवंगत नेते राजीव गांधी यांनी केरळमध्ये जाऊन त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यावेळी, राजीव गांधींनी सोन्याची रिंग त्यांना भेट दिली होती. विशेष म्हणजे, राजीव गांधींनी त्यावेळी मला दिलेली सोन्याची रिंग ही खरी भेट नव्हती, तर त्यांनी राज्याच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याचं मला सांगितलं, हीच खरी भेट होती, अशी आठवण रमेश यांनी जागविली आहे.