संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:11 PM2020-08-19T14:11:15+5:302020-08-19T14:11:56+5:30

‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ 

Sanjay Jha is using the language of BJP: Randeep Surjewala | संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला

संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला

Next
ठळक मुद्देझा यांच्या ट्विटमध्ये ज्या पत्रांचा उल्लेख केला त्याच्या अस्तित्वावरच काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी प्रवक्ते संजय झा यांनी केलेले आरोप काँग्रेसने फेटाळले असून झा हे भाजपने लिहिलेली भाषाच ट्विट करीत आहेत म्हणजे त्यातून फेसबुकवरून निर्माण झालेल्या वादावरून लक्ष दूर करता येईल, असे म्हटले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ज्या पत्रांचा उल्लेख केला त्या पत्रांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला. सुरजेवाला यांचे म्हणणे असे की, असे कोणतेही पत्र लिहिले गेलेले नाही की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना मिळाले.
सुरजेवाला यांनी स्पष्ट केले की, ‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ 
काँग्रेसमध्ये ही चर्चा राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यापासून होत आहे. कारण सोनिया गांधी यांनी फक्त एक वर्षासाठी अध्यक्षपद सांभाळले होते व त्याची मुदत याच महिन्यात संपलीदेखील. सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत नवा अध्यक्ष होणार नाही तोपर्यंत सोनिया गांधी अध्यक्ष असतील. 
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोनाच्या कारणामुळे राजकीय कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.

............................................................
पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज : झा
संजय झा यांनी ट्विटवर लिहिले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या जवळपास १०० नेत्यांनी (त्यात खासदारांचाही समावेश आहे) सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व परिवर्तन आणि पारदर्शक निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. हे खरे आहे की, कपिल सिब्बल, शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षात निवडणूक घेण्याबाबत व पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे.’’ 

Web Title: Sanjay Jha is using the language of BJP: Randeep Surjewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.