'मी लिहून देतो, मोदी सरकार येणार नाही', राहुल गांधीसोबतच्या चर्चेत सत्यपाल मलिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 04:04 PM2023-10-25T16:04:18+5:302023-10-25T16:05:14+5:30

राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Satyapal Malik claims in a discussion with Rahul Gandhi, 'I write, Modi government will not come' | 'मी लिहून देतो, मोदी सरकार येणार नाही', राहुल गांधीसोबतच्या चर्चेत सत्यपाल मलिकांचा दावा

'मी लिहून देतो, मोदी सरकार येणार नाही', राहुल गांधीसोबतच्या चर्चेत सत्यपाल मलिकांचा दावा

Rahul Gandhi-Satyapal Malik: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा केली. 28 मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी सत्यपाल मलिकांशी पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन, एमएसपी, जातिगणना, मणिपूर हिंसाचार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही, असेही ठणकावून सांगितले.

जम्मू-काश्मीरवर काय म्हणाले मलिक?
सत्यपाल मलिक म्हणाले, माझं स्पष्ट मत आहे की, जम्मू-काश्मीरच्या लोकांवर बळाचा वापर करुन काहीही फायदा होणार नाही. त्यांना प्रेमाणे, विश्वासाने जिंकावे लागेल. त्यांना राज्याचा दर्जा परत मिळावा, असे मलाही वाटते. त्यांनी कलम 370 मागे घेत केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. राज्याचीस पोलीस बंड करतील, अशी भीती त्यांना वाटत होती. पण, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केंद्र सरकारला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अमित शहा यांनी राज्याचा दर्जा परत करू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत करून तेथे निवडणुका घ्याव्यात, असं मलिक म्हणाले.

पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याबाबत प्रश्न विचारला असता सत्यपाल मलिक म्हणाले, पुलवामा हल्ल्याबाबत मी असे म्हणणार नाही की सरकारने तो घडवून आणला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. जेव्हा तुम्ही मतदानाला जाल, तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याना आठवा. पंतप्रधानांनी श्रीनगरला जायला हवे होते. राजनाथ सिंह तिथे आले होते, मीही तिथे होतो. ज्या दिवशी हे घडले, त्या दिवशी पीएम मोदी जीम कॉर्बेटमध्ये शूटिंग करत होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

RSS च्या विचारसरणीवर मलिक काय म्हणाले ?

राहुल म्हणाले की, भारतीय राजकारणात दोन विचारधारांमध्ये लढा आहे, एक गांधीवादी आणि दुसरी आरएसएस. दोन्ही हिंदुत्वाच्या आहेत. एक अहिंसा आणि बंधुभावाची विचारधारा आहे, तर दुसरी द्वेष आणि हिंसेची, यावर तुमचे काय म्हणणे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सत्यपाल मलिक म्हणाले की, मला वाटते की भारत उदारमतवादी हिंदू धर्माच्या मार्गावर चालेल तेव्हाच एक देश म्हणून टिकेल, अन्यथा त्याचे तुकडे पडतील. 

त्यांना मुद्द्यांचा इव्हेंट बनव्याची सवय - मलिक
तो कोणत्याही मुद्द्यातून इव्हेंट कसा बनवायचा, ते त्यांना माहीत आहे. महिला आरक्षण विधेयकाबाबतही तेच करण्यात आले. महिलांना काही मिळणार नाही, पणष त्यांनी खूप मोठे काम केले, असे ते दाखवून देत आहेत. संसदेच्या नवीन इमारतीची गरज नव्हती, पण त्यांनी (पंतप्रधान मोदींना) ती बांधली.  राहुल म्हणाले की, जेव्हा तुम्ही पुलवामा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा तुम्हाला सीबीआय आदींकडून धमक्या देण्यात आल्या. यावर मलिक म्हणाले, तक्रारदाराला शिक्षा होऊ शकत नाही, असा कायदा आहे. मी ज्यांची तक्रार केली, त्यांच्याऐवजी माझी तीनवेळा चौकशी झाली. मी म्हणालो, तुम्ही काहीही करा, तुम्ही माझे नुकसान करू शकणार नाही. मी भिकारी आहे, माझ्याकडे काही नाही, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी यावेळी व्यक्त केली. 

Web Title: Satyapal Malik claims in a discussion with Rahul Gandhi, 'I write, Modi government will not come'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.