काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचं निधन
By मोरेश्वर येरम | Published: December 21, 2020 04:03 PM2020-12-21T16:03:09+5:302020-12-21T16:04:22+5:30
मोतीलाल वोरा हे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत.
नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ मोतीलाल वोरा याचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. मोतीलाल वोरा यांनी दोनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. महत्वाची बाब म्हणजे वोरा यांचा कालच ९३ वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला होता.
मोतीलाल वोरा हे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या खजिनदारपदावर ते तब्बल १७ वर्ष कार्यरत होते. वाढतं वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी खजिनदार पदातून मुक्त करण्याची विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०१८ साली केली होती.
वोरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या खजिनदारपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांचंही २५ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जात होते. पक्षाचे राजकीय रणनितीकार म्हणूनही अहमद पटेल यांची ओळख होती. मोतीलाल वोरा आणि अहमद पटेल या दिग्गज नेत्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठं नुकसान झालं आहे.