ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांच्या पुत्राने काँग्रेसमधील पदांचा दिला राजीनामा, BBC ची डॉक्युमेंट्री ठरली वादाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:22 PM2023-01-25T12:22:24+5:302023-01-25T12:22:57+5:30

Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे.

Senior leader A.K. Antony's son resigns from Congress, BBC documentary sparks controversy | ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांच्या पुत्राने काँग्रेसमधील पदांचा दिला राजीनामा, BBC ची डॉक्युमेंट्री ठरली वादाचं कारण

ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांच्या पुत्राने काँग्रेसमधील पदांचा दिला राजीनामा, BBC ची डॉक्युमेंट्री ठरली वादाचं कारण

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी काँग्रेसमधील सर्व पदांवरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 
अनिल के. अँटोनी हे बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीबाबत केलेल्या आपल्या ट्विटनंतर काँग्रेसमध्येच घेरले गेले होते. त्यानंतर अनिल के अँटोनी यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करून राजीनामा देण्यामागची कारणेही सांगितली आहेत. 

अनिल अंटोनी यांनी ट्विट करून सांगितले की, माझ्यावर एक ट्विट डिलीट करण्यासाठी असहिष्णूपणे दबाव आणला जात होता. फ्रीडम ऑफ स्पिचच्या बाता मारणारेच माझ्यावर दबाव आणत होते. मी ट्विट डिलीट करण्यास नकार दिला. दरम्यान अनिल अँटोनी यांनी राजीनाम्याचं पत्रही ट्विट केलं आहे. 

दरम्यान, आपल्या राजीनामापत्रामध्ये शशी थरूर यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. तसेच काँग्रेस पक्षालाही घेरलेआहे. अनिल के अँटोनी यांनी काँग्रेसमधील सर्व पदांवरून राजीनामा देण्याची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीबाबत ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्याच पक्षामधून टीका सुरू झाली होती.  

Web Title: Senior leader A.K. Antony's son resigns from Congress, BBC documentary sparks controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.