राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:48 PM2020-08-20T13:48:27+5:302020-08-20T13:55:22+5:30
पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीनेच करावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीए-2च्या काळात पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःच त्यांना पंतप्रधान होण्याचा प्रस्तान दिला होता, असा दावा काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केला आहे. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोहिल म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रकृतीच्या समस्येमुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, असा प्रस्तान ठेवला होता. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांचा हा प्रस्ताव न स्वीकारता, आपण आपला कार्यकाळ पूर्ण करावा, अशी विनंती केली होती.
गतकाळातील काही उदारहणे देत गोहिल म्हणाले, गांधी कुटुंबाने नेहमीच मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी कधी सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवली नाही आणि कधीही सत्तेची लालसा धरली नाही. देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि तरुणांची इच्छा आहे, की राहुल गांधी यांनी त्यांचे नेतृत्व करावे. मात्र, यासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच अंतिम निर्णय घेईल, असेही गोहिल म्हणाले.
तत्पूर्वी, पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीनेच करावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. असे असतानाच गोहिल यांचे हे वक्तव्य आले आहे. ‘इंडिया टुमारो: कनव्हर्सेशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकात दावा करण्यात आला आहे, की प्रियंका यांनी राहुल गांधी यांच्या, गांधी कुटुंबा बाहेरील व्यक्तीनेच पक्षाचे नेतृत्व करावे, या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच, फार कमी लोक आहे, जे पक्षाचे नेतृत्व करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
हे पुसत्क ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसने नुकतेच प्रकाशित केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे, की राहुल गांधींनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानतंर, प्रियंका गांधी यांची मुलाखत घेण्यात आली होती. या पुस्तकात भारतातील युवा नेत्यांच्याही मुलाखती आहेत. यात प्रियंका गांधी यांनी लेखक प्रदीप छिब्बर आणि हर्ष शाह यांना सांगितले, की 'त्यांनी (राहुल गांधी) आपल्यापैकी कुणीही पक्षाचे अध्यक्ष व्हायला नको, असे म्हटले आहे आणि मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मला असे वाटते, की पक्षाने त्याचा मार्ग स्वतःच निवडायला हवा.'
सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत. तसेच पक्षातील एक वर्ग सातत्याने राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा पुन्हा सांभाळावी यासाठी आग्रही आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर