“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:34 PM2021-09-27T14:34:27+5:302021-09-27T14:36:51+5:30

काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest | “शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूआम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोतसंजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू असून, या कालावधीत सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यातच शेतकरी संघटना आणि नेत्यांनी देशभरात ‘भारत बंद’ची हाक दिल्यानंतर दिल्लीसह अनेक भागात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. (shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे अहिंसक आंदोलन आजही अखंड आहे. परंतु, शोषण करणाऱ्या सरकारला ते पसंत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा शेतकऱ्यांचा बंद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची भावना शेतकऱ्यांसोबत आहे. उद्योगधंदे तर अगोदरपासूनच बंद आहेत. बेरोजगारीमुळे लोक असेही घरातच बसलेले आहेत. त्यामुळे बंद तर सुरू आहेत त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारलाय. आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांकडून ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना वाट मोकळी करून दिली जाईल. परंतु, नागरिकांनी दुपारी जेवणाच्या वेळेनंतरच घरातून बाहेर पडावे, अन्यथा ट्राफिक जाममध्ये ते अडकून राहू शकतात, असे आवाहन भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी गोळा झाले आहेत. या बंदचा परिणाम रस्त्यांवरही दिसून आला. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या भारत बंदमुळे नोएडामध्ये वाहनांची मोठी रांगच रांग दिसून आल्या. दिल्ली गुरुग्राम हायवेवर अनेक किलोमीटर केवळ वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे.

Web Title: shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.