Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:41 PM2021-10-05T15:41:35+5:302021-10-05T15:43:29+5:30

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence | Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

Next
ठळक मुद्देलखीमपूर खिरी हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरलाय उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरजसंजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असून, लखीमपूर हिंसाचारासह आणखी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence) 

संजय राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मज्जाव केला जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुपारी ४.१५ वाजता भेट घेत आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

हे काही रामराज्य आहे का?

याआधी, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तत्पूर्वी, प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलीस हवी, तेव्हा मला अटक करु शकतात. पण शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा दृढ निश्चय बोलून दाखवत प्रियंका गांधी यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले होते.

Read in English

Web Title: shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.