... 'त्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 10:05 PM2019-05-05T22:05:11+5:302019-05-05T22:14:20+5:30
कपिल सिब्बल यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षांचे लोकसभा निवडणुकीतील यश आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार यावर भाष्य केले.
नवी दिल्ली - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावर बहुमत मिळणं शक्य वाटत नाही. मात्र, केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसला 272 जागा जिंकण्याची खात्री नाही. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचे नाव जाहीर केले नसल्याचे सिब्बल म्हणाले.
कपिल सिब्बल यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षांचे लोकसभा निवडणुकीतील यश आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार यावर भाष्य केले. राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार का घोषित करण्यात येत नाही. याबाबत उत्तर देताना, काँग्रेसला 272 जागांचा आकडा पार करणे शक्य वाटत नाही, त्यामुळेच काँग्रेसने राहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले नाही. जर, 272 जागा काँग्रेसने जिंकल्या तर राहुल गांधींचे नाव जाहीर करायला काहीच हरकत नव्हती, असे सिब्बल यांनी म्हटले. मात्र, संयुक्त पुरोगामी आघाडीतील पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव घेण्यास त्यांनी टाळले.
काँग्रेसला 272 जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला माहित आहे. तसेच, भाजपालाही 160 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईलय. त्यानंतर, 23 मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही सिब्बल यांनी म्हटले. उत्तर प्रदेशातील आघाडीबाबत बोलताना, आम्हाला सपा आणि बसपाची आघाडी आहे. मात्र, काँग्रेसने समाजावादी पक्षाची साथ सोडली नव्हती, उलट समाजवादी पक्षच मायावती यांच्यासोबत गेला. या दोन्ही पक्षांनी मिळून आम्हाला केवळ 2 जाग सोडल्या. त्यामुळे तिथे सपासोबत आघाडी शक्य झाली नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले.