दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत
By मोरेश्वर येरम | Published: November 20, 2020 04:17 PM2020-11-20T16:17:06+5:302020-11-20T16:23:06+5:30
दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत.
नवी दिल्ली
दिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. सोनिया यांच्यासह राहुल गांधी देखील गोव्यात राहणार आहेत. काहीवेळापूर्वीच हे दोघेही पणजी विमानतळावर दाखल झाले.
दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत.
Goa: Congress interim president Sonia Gandhi and her son and party leader Rahul Gandhi arrive in Panaji.
— ANI (@ANI) November 20, 2020
Doctors had earlier advised Sonia Gandhi to spend time in a less polluted place: Sources pic.twitter.com/zxThQR20mH
दिल्लीत कोरोनाचाही कहर वाढला आहे. दिवसेंदिवस नव्या रुग्णायंच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. केजरीवाल सरकारकडून शहरात नवे निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या सप्टेंबर महिन्यात वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या.
दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल यांनी स्वारस्य दाखवलं नव्हतं. काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. याशिवाय विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेस पक्षातही विरोधाचे वारे वाहत आहेत.