ED summons Sonia Gandhi : सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 02:09 PM2022-06-01T14:09:11+5:302022-06-01T17:20:23+5:30
ED summons Sonia Gandhi And Rahul Gandhi : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालकीच्या पक्ष-प्रचारित यंग इंडियनमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी नुकताच हा गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि त्यांचे खासदार पुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालकीच्या पक्ष-प्रचारित यंग इंडियनमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी नुकताच हा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत सोनिया आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे आहेत. नॅशनल हेराल्ड असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. तपासाचा भाग म्हणून एजन्सीने अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांची चौकशी करण्यात आली होती.
Enforcement Directorate summons Congress interim president Sonia Gandhi and party MP Rahul Gandhi over the National Herald case, which was closed by the investigating agency in 2015: Official Sources pic.twitter.com/RKqVNpEDXE
— ANI (@ANI) June 1, 2022